MLC Election : अर्ज भरताच कारख्यानाला नोटिस, उबाठाच्या उमेदवाराची अचानक निवडणूकीतून माघार

गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर आणि संचालक मंडळाविरोधात गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची पत्नी देवयानी डोणगावकर यांनी निवडणूकीतून अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला...

MLC Election : अर्ज भरताच कारख्यानाला नोटिस, उबाठाच्या उमेदवाराची अचानक निवडणूकीतून माघार
uddhav thackeray
| Updated on: Jun 04, 2026 | 6:53 PM

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार देवयानी पाटील डोणगाकर यांनी अखेरच्या क्षणी विधान परिषद निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता छत्रपती संभाजीनगर -जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे उमेदवार असणार आहेत. देवयानी पाटील डोणगाकर यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर अध्यक्ष असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याला नोटिस आल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने राजकारण तापले आहे. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर आणि संचालक मंडळाविरोधात गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेबाबत कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे.

कृष्णा पाटील डोणगावकर यांनी या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की माझ्यावर दबाव टाकण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र आम्ही त्याला भीक घालत नाही. मी सहकारात काम करणारा माणूस आहे, मला जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वाची आहे म्हणून मी माघार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की भाजपा – शिंदे शिवसेनेत मनोमिलन होत असल्यामुळे गणित जुळत नाही. म्हणून आपण अंबादास दानवे यांना सांगितले आहे की माघार घेत आहे, गणेश लोखंडे हे अधिकृत उमेदवार असतील. ते पुढे म्हणाले की जिल्हा परिषदेतही भाजपाला बाजूला ठेवायचा माझा प्रयत्न होता आणि आता सुद्धा तोच प्रयत्न होता.भाजपने मला नोटीस पाठवली आहे मात्र मी त्याला भीत नाही, आम्ही न्यायालयात दाद मागू असेही त्यांनी म्हटल आहे.

अंबादास दानवे यांना मी आधीच सांगतले होते…

कृष्णा पाटील डोणगावकर पुढे म्हणाले की अंबादास दानवे यांनी उमेदवारीसाठी माझ्या पत्नीचे फोटो मागितले, तेव्हाच सांगितले होते की पर्याय उमेदवार तयार ठेवा. बिनविरोध निवडणूक होऊ नयेत म्हणून आमचे दोन तयार उमेदवार होते, पण निवडणूक खर्चिक होती, लढण्यात काही फायदा नव्हता. या निवडणूक निकाल आधीच लक्षात आले होते, काही जमणार नाही. शिंदे यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण मदत मिळाली नाही असेही डोणगावकर यांनी सांगितले.

दोन्ही निवडणूक लढवणे मला शक्य नव्हते

साखर कारखाना समिती बरखास्त करण्याची मला नोटीस मिळाली आहे. त्याला मी घाबरत नाही, पण आहे ते घालवायचे नाही यामुळे माघार घेत आहे. आमच्यासाठी जिल्हा बँक निवडणूक महत्वाची आहे, त्यामुळे दोन्ही निवडणूक लढणे मला शक्य नव्हते, त्यामुळे पक्षाकडे विनंती करून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अतुल सावेंसारखा मोठा माणूस बँक निवडणूक लढवत आहे, भाजपला कुणाला राहू दयायचे आहे की नाही ? मलाही नोटीस देऊन दमबाजी देण्याचा प्रयत्न केला असेही ते त्राग्याने म्हणाले.

Follow Us