अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, शेतकऱ्यांना नुकसानीची धडकी

| Updated on: Mar 21, 2021 | 9:06 PM

बारामती, कोल्हापूर, पंढरपूर, अहनदनगर, शिर्डी, नाशिकमध्ये आजही पावसाने हजेरी लावली. (unseasonal rains with thunderstorm hit in maharashtra even today and farmers have been severely affected)

अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला, शेतकऱ्यांना नुकसानीची धडकी
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा
Follow us on

मुंबई : गेले तीन-चार दिवस अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील काही भागात हाहाकार माजवला असून आज पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकला झोडपून काढले. वादळीवारा, विजांचा कडकडाट, गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती राहणार असल्याचे म्हटले होते. बारामती, कोल्हापूर, पंढरपूर, अहनदनगर, शिर्डी, नाशिकमध्ये आजही पावसाने हजेरी लावली. (unseasonal rains with thunderstorm hit in maharashtra even today and farmers have been severely affected)

पश्चिम महाराष्ट्रात गारपीटीसह मुसळधार पाऊस

बारामती शहर आणि परिसरात पावसाची हजेरी लावली. वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शहर आणि तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडला. गडहिंग्लज, नेसरी भागात मुसळधार पाऊस झाला तर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण होते. मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. गारपीटसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावातल्या आठवडी बाजारांवरही पावसाचा परिणाम झाला. तर अहमदनगरमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला तर अनेक ठिकाणी गाराही पडल्या. अचानक झालेल्या गारांच्या पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झाले असून शेतकरी संकटात आला आहे.

नाशिकमध्येही पावसाची हजेरी

नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यातील माळवाडी परिसरात तुफान पाऊस पडला. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र पावसामुळे पिकांचे मात्र मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काल निफाड, पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी भागात गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

रब्बी पिकांचे मोठे नुकसान

चार दिवसापासून गारांसह सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे उभी पिके आडवी झाल्याने शेतकरीही आर्थिक संकटात आला आहे. पावसामुळे गहू, हरभरा, पिकाचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. अवकाळी पाऊस, वादळामुळे संत्री, गहू, चणा, भाजीपाला, फळपिकांच अतोनात नुकसान झालं आहे.

शिर्डीमध्येही गारपीटीसह पाऊस

शिर्डी आणि परिसरात आज सायंकाळी गारांच्या पावसाने हजेरी लावली. सुपारीसारख्या गारांचा वर्षाव झाल्याने उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा मिळालाय. राहाता, शिर्डी, निमगाव, पिंपळवाडी साकुरी आदी परिसरात गारपीट झाली. एकीकडे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मात्र रब्बीच्या पिकांचं मोठ नुकसान झालंय. सलग दुस-या दिवशी वादळासह गारांच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळबागांचही मोठ नुकसान झालंय. (unseasonal rains with thunderstorm hit in maharashtra even today and farmers have been severely affected)

इतर बातम्या

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिकमध्ये दिवसभरात तब्बल 2360 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 10 रुग्णांचा मृत्यू

LIVE | मावळ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट