बापरे ! दिवसभरात 30,535 रुग्ण, महाराष्ट्रात कोरोनाचा थयथयाट

चेतन पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 21, 2021 | 9:28 PM

महाराष्ट्रात ज्या गोष्टीची भीती होती, अगदी तीच गोष्ट आता घडताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना प्रचंड वेगाने फोफावतोय (Maharashtra Corona Update).

बापरे ! दिवसभरात 30,535 रुग्ण, महाराष्ट्रात कोरोनाचा थयथयाट
प्रातिनिधिक फोटो
Follow us

मुंबई : महाराष्ट्रात ज्या गोष्टीची भीती होती, अगदी तीच गोष्ट आता घडताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना प्रचंड वेगाने फोफावतोय (Maharashtra Corona Update). हा कोरोना इतका वाढत चाललाय की आज दिवसभरात राज्यात तब्बल 30,535 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या चार दिवसात फक्त महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी आजही हे आकडे गांभीर्याने घेतले नाहीत. तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याती शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आतातरी वेळीच सावध होण्याची जास्त आवश्यकता आहे.

गेल्या चार दिवसातील रुग्णसंख्या :

2o मार्च – 27 हजार 126 रुग्ण

19 मार्च – 25 हजार 681 रुग्ण

18 मार्च – 25 हजार 833 रुग्ण

17 मार्च – 23 हजार 179 रुग्ण

महत्त्वाच्या शहरांसह अनेक भागांमध्ये कोरोना वाढला

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरांसह अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे हा कोरोना आता गाव-खेड्यातही थैमान घालायला लागलाय. प्रत्येक शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा वाढता आकडा हा चक्रावून सोडणारा आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 2900 रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 3775 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नागपुरात 3614 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

मुंबईत किती रुग्ण सक्रीय?

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. मुंबईत दिवसभरात 3775 रुग्ण आढळले आहेत. तर 1647 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत सथध्या 23 हजार 448 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

पुण्यात परिस्थिती काय?

पुण्यात दिवसभरात 2900 करोना रुग्णांची नोंद झाली. तर 1245 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात आज दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत 2 लाख 35 हजार 394 रुग्णांना कोरोनाची लागण झालीय. आतापर्यंत 20 लाख 7 हजार 819 रुग्ण बरे झाले आहेत. तर 5 हजार 53 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पुण्यात सध्या 22 हजार 524 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

नागपुरात दिवसभरात 3614 रुग्ण

राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोनाने थैमान घातलं आहे. नागपुरात आज दिवसभरात तब्बल 3614 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 32 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. नागपूरमध्ये दिवसभरात 1859 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नागपुरात आतापर्यंत 1 लाख 93 हजार 80 जणांना कोरोनाची लागण झालीय. यापैकी 1 लाख 59 हजार 108 रुग्ण बरे झालेत तर 4624 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय.

दिवसभरात 99 कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात तब्बल 99 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 53 हजार 399 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर 2.15 टक्के एवढा आहे.

दिवसभरात 11,314 रुग्ण बरे

दरम्यान, राज्यात दिवसभरात 11,314 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 22,14,867 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 10 हजार 20 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI