AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिकेला दणका, इराणाला या देशाने पुरवली गुप्त माहिती… ट्रम्प यांचे धाबे दणाणले

इराणविरोधात सुरु असलेले अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धाने आता वेगळे वळण घेतले आहे. या युद्धात आता एका नव्या देशानी उडी घेतली आहे. या देशाने थेट अमेरिकेची गुप्त माहिती इराणला पुरवली आहे.

मोठी बातमी! अमेरिकेला दणका, इराणाला या देशाने पुरवली गुप्त माहिती... ट्रम्प यांचे धाबे दणाणले
Donald TrumpImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 08, 2026 | 10:39 AM
Share

मध्य पूर्वेतील संघर्षात आता रशियाची भूमिका स्पष्ट होत असल्याची लक्षणे दिसत आहेत, ज्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. रशियाने इराणला अशी गोपनीय माहिती पुरवली आहे, ज्याच्या आधारे तेहरान अमेरिकन सैन्यावर अचूक हल्ले करू शकते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने थेट रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कठोर संदेश पाठवला आहे.

इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या या तीव्र प्रतिकारामुळे अमेरिका-इस्रायलची धास्ती वाढली आहे. तीन-चार दिवसांत युद्ध संपेल असा दावा अमेरिका-इस्रायलकडून करण्यात येत होता, मात्र आता युद्ध सुरू होऊन एक आठवडा उलटला आहे. आखाती भागातील अमेरिकन लष्करी तळांवर इराणने हल्ले सुरू केले आहेत, ज्यामुळे अमेरिकेला मोठा फटका बसला आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

अमेरिकेचे मध्य पूर्व विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला. रशियाकडून इराणला ‘टार्गेटिंग इन्फॉर्मेशन’ (लक्ष्याची नेमकी माहिती) पुरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीच्या साहाय्याने इराण अमेरिकन युद्धनौका, लढाऊ विमाने आणि इतर सैन्य संपत्तींवर अचूक बॉम्बवर्षाव करू शकतो. विटकॉफ यांनी हे स्पष्ट केले की, अमेरिकेने रशियाला अशी मदत तातडीने थांबवण्याचा कडक इशारा दिला आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय?

या प्रसंगी विटकॉफ यांच्यासोबत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही हजर होते. मात्र, ट्रम्प यांनी रशियाच्या या गुप्त सहाय्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. “गेल्या आठवड्यात इराणची जी दयनीय अवस्था झाली आहे, ती पाहता रशियाकडून मिळणाऱ्या कोणत्याही माहितीचा फारसा फायदा होताना दिसत नाही,” असे ट्रम्प यांनी म्हटले. रशियाच्या या गोपनीय मदतीमुळे युद्धाच्या निकालात मोठा बदल होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रशिया-इराणमधील वाढती जवळीक

युक्रेनविरुद्ध चार वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाला क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सची मोठी आवश्यकता आहे, जी इराण पुरवत आहे. दुसरीकडे, अण्वस्त्र कार्यक्रम आणि हिजबुल्लाह, हमास सारख्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्यामुळे जगात एकटा पडलेल्या इराणसाठी रशियाचा साथ महत्त्वपूर्ण ठरत आहे. ही वाढती जवळीक मध्य पूर्वेतील संघर्षाला नवे वळण देऊ शकते.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी