उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला, ठाकरे बंधुंमध्ये दोन तास चर्चा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी ठाकरे बंधुंमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये विविध विषयांवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रींचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबातील या भेटीला कौटुंबिक जिव्हाळ्यासोबतच राजकीय महत्त्व देखील प्राप्त झाले आहे.
जुलै २०२५ मध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या भेटीगाठी सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. कधी राज ठाकरे हे उद्ध ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले तर कधी उद्धव ठाकरे हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले.
दरम्यान आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये विविध विषयांवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रींचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट घेतली आहे.
उद्धव ठाकरे हे दोन तासांहून जास्त वेळ राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होते. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी राजकीय समीकरणांवरही चर्चा झाल्याची माहीती समोर येत आहे, याचे काय दुरगामी परिणाम होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. सध्या राज्यात एसआयआरचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिवसेना ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी देखील याच मुद्द्यवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.