वैकुंठस्नेहींचा अनोखा गौरव; मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार; इस्लापुरमध्ये स्तुत्य कार्यक्रम

| Updated on: Jun 19, 2022 | 5:40 PM

मृत्यूप्रसंगी प्रत्यक्ष दहन, दफन, रक्षाविसर्जन, दहावा, उत्तर कार्य, या सर्व वेळी वैकुंठस्नेही मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा आधार बनून राहतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होत. दुःख हलके करण्याचा या मंडळींचा प्रयत्न स्तूत्य पथदर्शक व अभिनंदनास पात्र आहे. या कुटुंबीयांच्या मित्रांना सन्मानपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आले.

वैकुंठस्नेहींचा अनोखा गौरव; मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार; इस्लापुरमध्ये स्तुत्य कार्यक्रम
इस्लामपूरमध्ये 452 वैकुंठस्नेहींचा अनोखा गौरव
Image Credit source: tv9marathi
Follow us on

सांगलीः इस्लामपूरमध्ये 452 वैकुंठस्नेहींचा (Vaikunthasnehi)अनोखा गौरव सत्कार करण्यात आला आहे. मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी पूर्ण वेळ देणाऱ्या या 452 गुणवंतांचा गौरव (glory of 452 meritorious) यावेळी करण्यात आला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारे सर्जेराव यादव प्रतिष्ठानचा (Sarjerao Yadav Pratishthan) देशातील हा पहिलाच उपक्रम पार पडला.  या कार्यक्रमामुळे झाले समाजातील एका वंचित घटकांचा गौरव करण्यात आल्याने या कार्यक्रमाचेही कौतुक करण्यात आले. यावेळी अशा प्रकाराचे कार्यक्रम देशपातळीवर व्हावेत अशी इच्छाही मान्यवरांनी व्यक्त केली.

जातीधर्मापलिकडे जाऊन कार्य

जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मृत व्यक्तींच्या अंत्यविधी कार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या वाळवा तालुक्यातील 94 गावातील 452 वैकुंठस्नेहींचा सत्कार सर्जेराव यादव प्रतिष्ठान तर्फे आज इस्लामपूर येथे करण्यात आला.

दुःख हलके करण्याचा

मृत्यूप्रसंगी प्रत्यक्ष दहन, दफन, रक्षाविसर्जन, दहावा, उत्तर कार्य, या सर्व वेळी वैकुंठस्नेही मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा आधार बनून राहतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होत. दुःख हलके करण्याचा या मंडळींचा प्रयत्न स्तूत्य पथदर्शक व अभिनंदनास पात्र आहे. या कुटुंबीयांच्या मित्रांना सन्मानपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आले.

मानसिक आणि भावनिक आधार

गेल्या अनेक वर्षांपासून या व्यक्तींकडून मृत व्यक्तिंवर अंत्यसंस्कार केले जातात. त्याबरोबरच ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होतो. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही दुःखात असते.त्यामुळे त्यांना मानसिक आणि भावनिक आधार देण्याचे कामही या व्यक्तींकडून दिले जात आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी म्हणूनच सर्जेराव यादव प्रतिष्ठानकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

गुणवंत सज्जनांचा आज गौरव

मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी पूर्ण वेळ देणाऱ्या या गुणवंत सज्जनांचा आज गौरव करण्यात आला. यावेळी प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, ज्येष्ठ विचारवंत विश्वास सायनाकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, प्रांत अधिकारी संपत खिलारे उपस्थित होते.