विद्यानंद बापट यांना मारहाण होताच CM फडणवीसांचा मोठा निर्णय, गृहमंत्रालयाचा तातडीचा आदेश

गणेशोत्सवात लाऊडस्पीकर आणि डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली होती. या मारहाणीच्या घटनेची गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.

विद्यानंद बापट यांना मारहाण होताच CM फडणवीसांचा मोठा निर्णय, गृहमंत्रालयाचा तातडीचा आदेश
Vidyanand Bapat Police Security
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 6:42 PM

गणेशोत्सवात लाऊडस्पीकर आणि डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली होती. या मारहाणीच्या घटनेची गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विद्यानंद बापट यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे बापट यांच्यासोबत पोलिस संरक्षण असणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

विद्यानंद बापट यांना पोलिस संरक्षण

विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या संदर्भात पुणे महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विद्यानंद बापट यांना यापुढे पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट हे टीव्ही 9 मराठीशी बोलत गणेशोत्सवातील डीजेबाबत स्वत:ची भूमिका मांडत होते. त्यावेळी एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली. त्यानंतर काही जण आले आणि त्यांनी तरुणाला रोखले. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली. त्यानंतर विद्यानंद बापट यांनी घडलेल्या घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली.

घडलेल्या घटनेविषयी बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, एक वेडा अचानक आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. तुम्ही पाहात होतात. त्याने का केला कारण मी सशस्त्र नव्हतो हे पाहून त्यांनी हल्ला केला. किंवा आजूबाजूला पोलीस नव्हते हे पाहून त्याने हल्ला केला. जर पोलीस असते तर ते सशस्त्र. टेकनिकली पोलीस इथे आहेत पण त्यांच्याकडे रिव्हॉलवरच नाहीये. हे बघून ते करतायेत. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्. त्याला फक्त चीप पब्लिसिटी पाहिजे होती. सवंग प्रसिद्धीसाठी. तुम्ही पाहिलच आहे. तुम्ही साक्षीदार होतात. तुम्हाला तर माहितीच आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us