दीड हजार रुपये मानधन, तोकड्या सुविधा, वर्ध्याची आशा वर्कर अर्चना घुगरे झळकल्या टाईम मॅगझिनमध्ये

| Updated on: Apr 07, 2021 | 2:53 PM

पण अर्चना यांनी केलेल्या कामामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Asha worker Archana Ghugare appeared in Time magazine)

दीड हजार रुपये मानधन, तोकड्या सुविधा, वर्ध्याची आशा वर्कर अर्चना घुगरे झळकल्या टाईम मॅगझिनमध्ये
Archana Ghugare
Follow us on

वर्धा : जागतिक टाईम मॅगझिनमध्ये लेख, छायाचित्र यावं असे अनेकांचे स्वप्न असतं. वर्ध्याच्या पवनार या ठिकाणच्या आशा वर्कर अर्चना घुगरे या टाईम मॅगझिनमध्ये झळकल्या आहेत. आशा वर्कर म्हंटलं तर तुटपुंज्या पगारात काम करणाऱ्या या स्त्रिया डोळ्यासमोर येतात. पण अर्चना यांनी केलेल्या कामामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Asha worker Archana Ghugare appeared in Time magazine)

कोरोना काळात फ्रंटलाईन वर्करसोबत काम

अर्चना रामदास घुगरे या पवनार येथे आशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळात प्रत्येक जण सुरक्षित वातावरणाच्या शोधात होते. तर दुसरीकडे पोलीस, महसूल विभागासोबतच फ्रंटलाईन वर्कर म्हणून आरोग्य यंत्रणेअंतर्गत येणाऱ्या आशा वर्करनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. पती, दोन मुली असं कुटुंब असलेल्या अर्चना घुगरे यांना कोरोना काळात काम पडेल तेव्हा फिल्डवर जावं लागतं होतं. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आशा वर्कर म्हणून त्यांनी केलेलं काम महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांना कुटुंबातील सदस्यांचीही मदत मिळाली आहे.

दीड हजार रुपये मानधन, तोकड्या सुविधा, बरेचदा अनेकांकडून होणारा विरोध, प्रतिकूल वातावरणातही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. नागरिकांची माहिती घेणं, जनजागृती करणं, शासनाच्या नियमांची माहिती देणं, सर्वेक्षण करणं इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडल्या. आताही त्या पार पाडत आहेत. कोरोना रुग्ण निघाल्यास कंटेन्मेंट झोन परिसरात सर्वेक्षण करणं, वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे अनुषंगाने काम केलं आहे.

अर्चना घुगरे यांच्या व्हिडीओ आणि माहितीला सर्वाधिक पसंती 

नोव्हेंबर महिन्यात टाईम मॅगझिनच्या पत्रकार अवंतिका यांनी आशा वर्कर म्हणून अर्चना घुगरे यांच्याकडून माहिती घेतली. अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्करवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी याबाबतची बहुतांशी माहिती गोळा केली. अर्चना यांच्या व्हिडीओ आणि माहितीला सर्वाधिक पसंती मिळाली. यानंतर टाईम मॅगझिनमध्ये चित्र झळकले आहे.

कोरोना काळात घरोघरी जाऊन काम करणाऱ्या या आशा वर्कर नेहमीप्रमाणे दुर्लक्षित राहल्या आहेत. अर्चना घुगरे यांचे चित्र टाईम मॅगझिनमध्ये आल्याने गावात आनंद व्यक्त होत आहे.

मानधन वाढीची मागणी 

अपुऱ्या सुविधा, अल्प मानधन असतानाही आशा वर्कर जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. त्याशिवाय सरकारकडून येणाऱ्या सूचनांची, आदेशांची अमलबजावणी करत आहेत. मानधन वाढीची त्यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली जाते. पण तरीही सरकारकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता तरी त्यांचं मानधन, सुविधा वाढवाव्यात अशी मागणी केली आहे.  (Asha worker Archana Ghugare appeared in Time magazine)

संबंधित बातम्या :

राज्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा

Fact Check: पुण्यात 450 बेड्सचं नवं रुग्णालय उपलब्ध?; नेमकं सत्य काय?

पुण्यात कोरोनाचा हाहा:कार, रुग्णालये अपुरी; रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स घेतल्या भाड्याने