Fact Check: पुण्यात 450 बेड्सचं नवं रुग्णालय उपलब्ध?; नेमकं सत्य काय?

Fact Check: पुण्यात 450 बेड्सचं नवं रुग्णालय उपलब्ध?; नेमकं सत्य काय?
Pune Wipro

पुण्यात हिंजवडीमध्ये 450 बेड्सचं कोविड रुग्णालय उभारण्यात आलं असून या रुग्णालयात सर्व सुविधा मोफत दिल्या जात असल्याचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. (is Wipro set up covid hospital in pune?, whats facts about viral message?)

भीमराव गवळी

|

Apr 07, 2021 | 1:07 PM

पुणे: पुण्यात हिंजवडीमध्ये 450 बेड्सचं कोविड रुग्णालय उभारण्यात आलं असून या रुग्णालयात सर्व सुविधा मोफत दिल्या जात असल्याचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. संपर्कासाठी या मेसेजमध्ये दोन नंबरही देण्यात आले आहेत. मात्र, हा मेसेज फेक असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे रुग्णांनी अशा प्रकारच्या फेक मेसेज पासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. (is Wipro set up covid hospital in pune?, whats facts about viral message?)

काय आहे मेसेज?

इंग्रजीमध्ये हा मेसेज व्हायरल होत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर हा मेसेज व्हायरल होत असल्याने तो अधिकच व्हायरल केला जात आहे. ‘पुण्यात कोरोनावर उपचार करण्यासाठी बेड मिळत नसेल तर हिंजवडीत संपर्क साधा. हिंजवडीत विप्रो कँम्पसमध्ये 450 बेड्सचं रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत आहेत. उद्योगपती अजीम प्रेमजी यांच्या विप्रो ग्रुपने हे रुग्णालय उभारलं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन आणि सर्व प्रकारच्या मेडिकल सुविधा देण्यात येत आहेत. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. गरजवंतांनी राजेंद्र मोहिते यांच्याशी 919518593779 / 919011087560 या क्रमांकावर संपर्क साधावा’, असं आवाहन या मेसेजमधून करण्यात आलं आहे.

पडताळणी केल्यावर…

हा मेसेज व्हारल झाल्यानंतर आम्ही या दोन्ही नंबरशी संपर्क साधला. मात्र, दोन्ही नंबर बंद असल्याचं आढळून आलं. आमच्या पुण्यातील प्रतिनिधींनीही या मेसेजची खातरजमा केली. मात्र, हा मेसेज फेक असल्याचं आढळून आलं आहे. विप्रोने कुठलाही असा अधिकृत मेसेज व्हायरल केलेला नाही, तसेच कुणाला करायलाही सांगितला नाही. तसेच विप्रोकडूनही कोणत्याही प्रकारचा मेसेज व्हायरल करण्यात आलं नसून कोणतंही अपिल केलं नसल्याचं आढळून आलं आहे. विप्रोच्या नावावर कुणी तरी हा खोडसाळपणा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सत्य काय?

पुण्यातील हिंजवडीमध्ये विप्रोने 450 बेड्सचं रुग्णालय उभारलं आहे. मात्र हे नवीन रुग्णालय नाही. तर जून 2020मध्ये पुण्यात कोरोनाच कहर वाढल्याने विप्रोने त्यांच्या आयटी कार्यालयाचं कोविड रुग्णालयात रुपांतर केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचं ऑनलाईन उद्घाटनही केलं होतं. हे रुग्णालय तात्पुरतं होतं. वर्षभरानंतर ही जागा कंपनीच्या ताब्यात देण्याच्या अटीवर हे रुग्णालय उभारण्यात आलं होतं. मात्र, आता कुणीतरी खोडसाळपणे या रुग्णालयाबाबतचा मेसेज व्हायरल केल्याचं उघड झालं आहे. (is Wipro set up covid hospital in pune?, whats facts about viral message?)

संबंधित बातम्या:

पुण्यात कोरोनाचा हाहा:कार, रुग्णालये अपुरी; रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स घेतल्या भाड्याने

Pandharpur By-Election : भाजपला आणखी एक धक्का, बिनीचा शिलेदार जायबंदी, प्रमुख नेत्यालाच कोरोना

आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना लस आधी द्या, वेश्या व्यवसायातील महिलांची मागणी

(is Wipro set up covid hospital in pune?, whats facts about viral message?)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें