आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना लस आधी द्या, वेश्या व्यवसायातील महिलांची मागणी

ब्राझीलमधील बेलो होरिजोंटे या दक्षिण पूर्वेकडील शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आंदोलनाला बसल्या आहेत. (Brazil Prostitutes corona vaccine )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:46 PM, 7 Apr 2021
आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना लस आधी द्या, वेश्या व्यवसायातील महिलांची मागणी
ब्राझीलमधील वेश्यांचं कोरोना लसीसाठी आंदोलन

रिओ डी जानेरिओ : कोरोना संसर्गाशी दोन हात करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम (corona vaccine) वेगाने राबवली जात आहे. कोव्हिड योद्धे, ज्येष्ठ नागरिक असा प्राधान्यक्रम प्रत्येक सरकारने ठरवलेला आहे. विविध देशांमध्येही फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यास प्राधान्य दिले जात आहे. अशातच कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या ब्राझीलमध्येही लस घेण्यासाठी अहमहमिका लागली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनीही (Brazil Prostitutes) आपल्या आधी लस मिळावी अशी मागणी केली आहे. (Brazil Prostitutes strike for frontline corona vaccine campaign)

वेश्या विक्रेत्यांचं आठवड्याभरापासून आंदोलन

ब्राझीलमधील बेलो होरिजोंटे या दक्षिण पूर्वेकडील शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आंदोलनाला बसल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या प्राधान्य यादीत आमचाही समावेश करा, अशी मागणी करत वेश्या आठवड्याभरापासून धरणं आंदोलन करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

“आम्ही फ्रंटलाईन वर्कर्स”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलमध्ये हॉटेल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे बेलो होरिजोंटे शहरातील हजारो वेश्यांना आपली सेवा पुरवण्यासाठी भाड्यावर खोली घ्यावी लागत आहे. आम्ही फ्रंटलाईन वर्कर्स आहोत. आम्हीही हिरीरीने पुढे आहोत. आम्ही अर्थव्यवस्था चालवत आहोत. त्यामुळे आमच्या आरोग्याची जोखीमही मोठी आहे, आमच्या डोक्यावरही टांगती तलवार आहे, असं मिनास गॅरेस राज्यातील वेश्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा सीडा विएरा यांचं म्हणणं आहे.

“दररोज नव्या भेटी, आयुष्य धोक्यात”

आम्ही प्राथमिक गटाचा एक भाग आहोत. कारण दररोज आम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि आपलं आयुष्य धोक्यात घालतो. सरकारने लसीकरणासाठी प्राथमिक गटात आरोग्य कर्मचारी, शिक्षक, वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींचा समावेश केला आहे. त्यामुळे आमचाही सहभाग करुन घ्यावा, असं आंदोलक महिलांचं म्हणणं आहे. (Brazil Prostitutes strike for frontline corona vaccine campaign)

ब्राझीलमध्ये 3 लाख 32 हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

ब्राझीलमध्येही कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. एक लाख लोकसंख्येमागे 121 मृत्यूंची नोंद झाली आहे. हा आकडा सर्वात कमी मानला जातो. आतापर्यंत ब्राझीलमध्ये कोरोनामुळे 3 लाख 32 हजारांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.

संबंधित बातम्या :

कारमध्ये एकटे असेल तर मास्क लावावा की नाही?; हायकोर्टाचा मोठा निर्णय

पुण्यात कोरोनाचा हाहा:कार, रुग्णालये अपुरी; रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स घेतल्या भाड्याने

(Brazil Prostitutes strike for frontline corona vaccine campaign)