कोरोनाची लस सर्वांना सरसकट मिळणार का?; केंद्र सरकारने दिले ‘हे’ उत्तर

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सर्वांनाच सरसकट कोरोनाची लस देण्याची मागणी होत आहे. ('Aim is to vaccinate the ones who need it rather than the ones who want it')

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:26 PM, 6 Apr 2021
कोरोनाची लस सर्वांना सरसकट मिळणार का?; केंद्र सरकारने दिले 'हे' उत्तर
सांकेतिक फोटो

नवी दिल्ली: देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सर्वांनाच सरसकट कोरोनाची लस देण्याची मागणी होत आहे. त्यावर केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांना अधिक धोका आहे, त्यांनाच प्राधान्याने लस देण्यात येणार असल्याचं केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं आहे. (‘Aim is to vaccinate the ones who need it rather than the ones who want it’)

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मीडियाशी संवाद साधताना ही भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या देशांमध्ये 60 ते 69 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांनाच लस देण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या 16 ते 64 वयोगटातील व्यक्तींनाही लस देण्यात आली आहे. सर्वांना लस का देण्यात येत नाही? असा सवाल आम्हाला केला जात आहे. खरे तर या लसीकरणाचे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे मृत्यू रोखणे आणि दुसरा म्हणजे आरोग्य प्रणाली सुरक्षित करणे. ज्यांना लस टोचून घ्यायची इच्छा आहे, त्यांना लस देणं हा उद्देश नाही. तर, ज्यांना लस देण्याची खरोखरच गरज आहे, त्यांना लस देण्यात येत आहे, असं भूषण यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील कोरोना बळी वाढले

पंजाब आणि छत्तीसगडमधील कोरोना बळींची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील मृतांची संख्या इतर राज्यातील कोरोना बळींपेक्षा अधिक आहे. छत्तीसगड हे खूप छोटं राज्य आहे. येथील लोकसंख्या अत्यंत कमी आहे. तरीही या राज्यातील सहा टक्के लोकांना कोरोना झालेला आहे. आणि येथील मृत्यूदर तीन टक्के आहे. फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर छत्तीसगडमधील मृत्यूदरामध्ये वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात चाचण्या कमी

आम्ही राज्य सरकारांना आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात गेले काही आठवडे टेस्ट कमी झाल्या. महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यात केवळ 60 टक्केच आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. आम्ही सर्व राज्यांना 70 टक्क्यांपेक्षा अधिक टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (‘Aim is to vaccinate the ones who need it rather than the ones who want it’)

 

संबंधित बातम्या:

‘राज्यात व्हेंटिलेटरची संख्या मुबलक, मात्र हाताळणारे कमी’, आरोग्य मंत्र्यांची आरोग्य कर्मचारी तुटवड्यावर कबुली

‘लॉकडाऊन लागू करु नका, गरिबांचं नुकसान होईल’, संशोधक-डॉक्टरांची सरकारला विनंती

मुंबईत लहान मुलांभोवती कोरोनाचा विळखा वाढला, नेमक्या कोणत्या वयाला जास्त धोका? कारण काय?

(‘Aim is to vaccinate the ones who need it rather than the ones who want it’)