‘लॉकडाऊन लागू करु नका, गरिबांचं नुकसान होईल’, संशोधक-डॉक्टरांची सरकारला विनंती

प्रोग्रेसिव मेडिकोज अँड सायंटिस्ट या डॉक्टर आणि संशोधकांच्या फोरमने रविवारी (4 एप्रिल) केंद्र सरकारला टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू न करण्याची विनंती केलीय.

'लॉकडाऊन लागू करु नका, गरिबांचं नुकसान होईल', संशोधक-डॉक्टरांची सरकारला विनंती


नवी दिल्ली : भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचंही आता स्पष्ट झालंय. त्याचमुळे या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी आता लॉकडाऊनचीही चर्चा सुरु झालीय. याच पार्श्वभूमीवर प्रोग्रेसिव मेडिकोज अँड सायंटिस्ट या डॉक्टर आणि संशोधकांच्या फोरमने रविवारी (4 एप्रिल) केंद्र सरकारला टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू न करण्याची विनंती केलीय (Doctors and Researcher forum oppose lockdown due to damage of poor peoples).

“गरिबांचं नुकसान होईल अथवा त्यांच्या जीवाला धोका तयार होईल, असे कोणतेही नियम करु नये,” अशी भूमिका या फोरमने मांडलीय. “दवाखान्यांची संख्या, बेड आणि मानव संसाधनांची संख्या वाढवावी आणि आरोग्य सेवेला जागतिक दर्जाचं करावं,” असंही त्यांनी नमूद केलंय.

मोठे नेत्यांकडून धार्मिक कार्यक्रम, रॅली, मग जनतेसाठी लॉकडाऊन का?

प्रोग्रेसिव मेडिकोज अँड सायंटिस्ट फोरमचे अध्यक्ष डॉक्टर हरजीत सिंह भट्टी म्हणाले, “काही मोठे नेते स्वतः धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. मोठमोठ्या रॅली काढत आहे आणि दुसरीकडे जनतेला टाळेबंदीच्या सूचना देत आहेत. हे तार्किक नाही. यामुळे लोकांच्या मनात शंका तयार होत आहे आणि यातील गांभीर्य कमी करत आहे. कोरोना व्हायरस संबंधित सर्व तपासण्या आणि लसीकरण हे वैज्ञानिक सिद्धांतानुसार होणे अपेक्षित आहे. देशातील सर्व स्थरातील लोकांची तपासणी आणि लसीकरण मोफत व्हावे.”

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या आश्चर्यचकित करणारी

दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या आश्चर्यचकित करणारी आहे. देशात कोरोना झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देशातून समोर आलेला आकडा इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. शनिवारी हा आकडा अधिक वाढला आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

हेही वाचा :

Maharashtra Weekend lockdown: टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये : अजित पवार

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Weekend lockdown: राज्यात वीकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

व्हिडीओ पाहा :

Doctors and Researcher forum oppose lockdown due to damage of poor peoples

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI