Maharashtra Weekend lockdown: टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि त्यावरील कडक निर्बंधांवर बोलताना माध्यमांचेही कान टोचलेत.

Maharashtra Weekend lockdown: टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये : अजित पवार
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 6:08 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोना स्थिती आणि त्यावरील कडक निर्बंधांवर बोलताना माध्यमांचेही कान टोचलेत. “लोक म्हणतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये निवडणुका आहेत. तिकडेही गर्दी होते, मग महाराष्ट्रात निवडणुका का नको. त्यामुळे टीव्ही चॅनलवाल्यांनी देशातील इतर ठिकाणचे गर्दीचे व्हिडीओ महाराष्ट्रात दाखवत बसू नये,” असं आवाहन अजित पवार यांनी केलंय (Ajit Pawar comment on Corona Lockdown Election crowd and media).

अजित पवार म्हणाले, “लोकं म्हणतात पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत, केरळमध्ये आहेत, तामिळनाडूत पण आहे. ते तुम्ही टीव्ही चॅनलवाले दाखवतात. मग तिथं गर्दी होते मग इकडं का नाही. त्यामुळे तेथील मतदान होत नाही तोपर्यंत तिकडले शॉट सगळ्या महाराष्ट्रात दाखवत बसू नका. तिथं निवडणूक असल्याने थोडंसं हे घडणार परंतू ती निवडणूक संपल्या संपल्या तिथं बाकीची नियमावली कडक केली जाईल.”

“आज रविवार आहे बैठक आहे हे तुम्हाला कुणी सांगितलं होतं का? तरीही तुम्ही इथं आलात. मला आज दुपारी मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि त्यांनी तातडीची बैठक घ्यावी लागत असल्याचं सांगितलं. लगेच तुम्ही 10-20 कॅमेरा आलेच ना. तुम्ही 10-20 जण आणि तुमच्यासोबत आणखी काही लोक असे लोक जमत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘आम्हालाही लॉकडाऊन करायला फार समाधान वाटत नाही’

अजित पवार म्हणाले, “आम्हालाही लॉकडाऊन करायला फार समाधान वाटत नाही. परंतु इतके दिवस आपण सातत्याने सर्वांना सांगतोय की प्रत्येकाने काळजी घ्या. प्रत्येकाने नियमांचं पालन करा, कडक भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका. मागच्या वर्षी लोकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याने नियमांचं तंतोतंत पालन झालं. मात्र आता तसं होताना दिसत नाही”.

31 मार्चला मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय

“पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला कोरोना निर्बंधांमधून सूट देण्यात आलीय. कारण ही भारत सरकारने लावलेली निवडणूक आहे. आज झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चला मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. जिथं इलेक्शन आहे तिथं ते जाहीर झालं असल्यानं तिथं सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि उमेदवार या सर्वांनी मिळून कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा :

Maharashtra Lockdown : संपूर्ण महाराष्ट्रात ‘मिनी लॉकडाऊन’, काय बंद, काय सुरु राहणार?

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

lockdown in maharashtra: राज्यात वीकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar comment on Corona Lockdown Election crowd and media

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.