AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारमध्ये एकटे असेल तर मास्क लावावा की नाही?; हायकोर्टाचा मोठा निर्णय

मास्क वापरण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. (Mask mandatory even if a person is driving alone, says Delhi High Court)

कारमध्ये एकटे असेल तर मास्क लावावा की नाही?; हायकोर्टाचा मोठा निर्णय
mask compulsory in alone in car
| Updated on: Apr 07, 2021 | 11:54 AM
Share

नवी दिल्ली: मास्क वापरण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तुम्ही घरी किंवा कारमध्ये एकटे असाल तरी मास्क लावणे बंधनकारक आहे. नाहीतर दंड आकारला जाईल, अशी तंबीच उच्च न्यायालयाने दिली आहे. (Mask mandatory even if a person is driving alone, says Delhi High Court)

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिल्ली उच्च न्यायालयानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. कारमध्ये तुम्ही एकटे असला तरी मास्क लावावे लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. एवढेच नव्हे तर कार सुद्धा सार्वजनिक ठिकाण असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. कारमध्ये एकटे असताना मास्क लावण्यात सांगण्यात येत असल्याबद्दल कोर्टात चार याचिका आल्या होत्या. त्या सर्व याचिका कोर्टाने फेटाळून लावत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

मास्क सुरक्षा कवच

कारमध्ये जर आम्ही एकटे असू तर मास्क लावले नाही म्हणून दंड वसूल केला जाऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने सुनावणी करताना, कार भलेही कोणत्याही एका व्यक्तीची असेल मात्र ती एक सार्वजनिक जागाच आहे. मास्क सुरक्षा कवचासारखं आहे. त्याद्वारे कोरोना संसर्ग रोखता येतो. त्यामुळे तुम्ही घरी असा किंवा कारमध्ये मास्क लावलाच पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं आहे. जस्टिस प्रतिबा एम सिंह यांनी हा निर्णय दिला आहे.

दिल्लीत नाईट कर्फ्यू

दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मंगळवारपासून दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू असणार आहे. रात्रीच्या संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली सरकारने पुन्हा लॉकडाऊन करण्यास नकार दिला आहे. लग्न, अत्यंविधी आणि इतर कार्यक्रमांसाठीही दिल्ली सरकारने नियमावली जारी केली आहे.

यांना सूट

दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आली असली तरी त्यातून काही सेवांना वगळण्यात आलं आहे. आरोग्य, आपत्ती नियंत्रण, पोलीस, सिव्हिल सर्व्हिस, फायर सर्व्हिस, जिल्हा प्रशासन, अकाऊंट , वीज विभाग, पाणी विभाग, साफसफाई आणि स्वच्छता विभाग, विमानसेवा, रेल्वे, सर्व प्रकाराचा मेडिकल स्टाफ, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, क्लिनिक आणि अत्यावश्यक सेवा आदींना या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. (Mask mandatory even if a person is driving alone, says Delhi High Court)

संबंधित बातम्या:

कुठे लॉकडाऊन तर कुठे नाईट कर्फ्यू, देशातील कोणत्या शहरात काय?; वाचा सविस्तर

जळगावात कोरोना रुग्णांचा उपचारातील दुर्लक्षाने मृत्यू, राज्यपालांना पत्र लिहित कुटुंबियांचे गंभीर आरोप

कोरोनाची लस सर्वांना सरसकट मिळणार का?; केंद्र सरकारने दिले ‘हे’ उत्तर

(Mask mandatory even if a person is driving alone, says Delhi High Court)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.