Washim | वाशिमच्या सवड, रिसोडमध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरूवात, खरिपाच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

| Updated on: Aug 04, 2022 | 8:21 AM

गेल्या 20 दिवसांत झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली असून 47 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. 138 प्रकल्पांत सरासरी 62.91 टक्के जलसाठा झाला आहे. यंदा पाऊस मनसोक्त बरसत असल्याने पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून येते.

Washim | वाशिमच्या सवड, रिसोडमध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरूवात, खरिपाच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
Follow us on

मुंबई : वाशिम (Washim) जिल्ह्यातील सवड, रिसोडसह अनेक ठिकाणी आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावलीयं. मागील आठवड्यापर्यंत पावसाने जिल्ह्यात मोठा धुमाकूळ घातला होता. आज पुन्हा पाऊस (Rain) सुरू झाल्याने खरिपाच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात 3 ऑगस्ट (August) रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मागील 24 तासात सरासरी 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर 1 जून 2022 पर्यंत जिल्ह्यात एकुण 494.7 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.

सवड, रिसोडसह अनेक ठिकाणी आज पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी

सर्वाधिक पाऊस मानोरा तालुक्यात 590.1 मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस कारंजा तालुक्यात 376.6 मिलीमिटर पडल्याची नोंद झाली. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2022 पासूनची आहे. वाशिम तालुका – 0.4 मिमी,( 478.1), रिसोड तालुका – निरंक (510.8), मालेगाव तालुका – निरंक (522.4), मंगरूळपीर तालुका – निरंक (520), मानोरा तालुका – निरंक (590.1) आणि कारंजा तालुका – निरंक (375.6) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 3 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 552.4 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.

हे सुद्धा वाचा

संततधारेमुळे धरण्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ

गेल्या 20 दिवसांत झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली असून 47 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. 138 प्रकल्पांत सरासरी 62.91 टक्के जलसाठा झाला आहे. यंदा पाऊस मनसोक्त बरसत असल्याने पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून येते. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला होता. मागील 20 दिवसांत झालेल्या संततधार पाऊस सातत्याने सुरू आहे. यंदाच्या पावसामुळे वाशिम जिल्हाचा पाण्याचा प्रश्न हा कायमचाच मिटला आहे.