Tejas Thackeray : आदित्य, अमितनंतर तेजस ठाकरेंची एन्ट्री? ठाकरे कुटुंबातील तिसरे सदस्य राजकारणात येणार?

तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकीय कार्यक्रमात आतापर्यंत फारसे दिसले नाहीत. पण, आता त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीची चांगलीच चर्चा आहे. ठाकरे कुटुंबातील आदित्य, अमित यांच्यानंतर राजकारणात तेजस ठाकरेंची चर्चा आहे. 

Tejas Thackeray : आदित्य, अमितनंतर तेजस ठाकरेंची एन्ट्री? ठाकरे कुटुंबातील तिसरे सदस्य राजकारणात येणार?
तेजस ठाकरे राजकारणात येणार?Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 7:58 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन वेगळा मार्ग निवडल्यानं ठाकरेंना मोठा धक्का बसला. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. आमदार-खासदारांनंतर शिवसेनेचे पदाधिकारीही शिंदेंकडे जात असल्यानं ठाकरे घराणं त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहे. अशातच आता माजी मंत्री आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यानंतर तेजस ठाकरे (Tejas Thackeray) राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.  यावरुन संघर्षाच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शेवटचं अस्त्र बाहेर काढल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरेंचे पूत्र तेजस ठाकरे राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, याला कारण ठरत आहे ती तेजस ठाकरेंची सार्वजनिक कार्यक्रमातली उपस्थिती.

संघर्षाच्या काळात ठाकरेंचं नवं अस्त्र

शिवसेनेत पडलेली मोठी फूट त्यामुळे उद्धव ठाकरे यांना गमवावं लागलेलं मुख्यमंत्रीपद, सध्या संघर्षाचं काळ दर्शवतंय. पक्षातील मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी देखील उद्धव ठाकरेंच्या चिंतेचा विषय बनला आहे. यातच आता बंडखोरीनंतर तेजस ठाकरे कोल्हापूरच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आलेय. यानंतर त्यांनी कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीचं दर्शन घेतलं. तेजस ठाकरे राजकारणात आले तर नवल वाटायला नको, असं शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.

आदित्य, अमितनंतर तेजस ठाकरेंची एन्ट्री?

ठाकरे कुटुंबातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे राजकारणात आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे देखील राजकारणात सक्रिय आहे. आता त्यानंतर तेजस ठाकरेंच्या राजकारणातील एन्ट्रीचे संकेत मिळतायत.

सूचक विधान चर्चेत

तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे म्हटले जात आहे. तशी चर्चा सुरू आहे. याच चर्चेवर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार की नाही याचा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील. तसेच तेजस ठाकरे राजकारणात आले तर त्यात नवे वाटून घेण्याची गरज नाही, असे सूचक विधान केले.

2019मध्ये अहमदनगरमध्ये व्यासपीठावर

2019 साली अहमदनगरमध्ये तेजस ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर आले होते. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या भेटीदरम्यान तेजस ठाकरेही उपस्थित होते. वन्यजीव संशोधनामध्ये तेजस ठाकरे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये आदित्य ठाकरे जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही आपण लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगितलं आहे. तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकीय कार्यक्रमात आतापर्यंत फारसे दिसले नाहीत. पण, आता त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीची चांगलीच चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.