देवाकडे आपण काय मागायला पाहिजे? देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजा फडणवीस यांचा मोठा संदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस या देखील सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही देवाकडे काय मागावं याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

देवाकडे आपण काय मागायला पाहिजे? देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने  शेअर केला खास व्हिडीओ, दिविजा फडणवीस यांचा मोठा संदेश
Divija Fadanvis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 9:23 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस या देखील सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आपण सर्वजण देवाकडे काय मागतो? आणि काय मागितलं नाही पाहिजे? याबद्दल या व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. देवाची भक्ती कशी करावी? देवाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे? यासंदर्भात त्यांनी फार सुंदर असं विवेचन या व्हिडीओमध्ये केलं आहे.

आपण सर्वजण देवाकडे काय मागत नाहीत? देवा हे काम कर, देवा ते काम कर परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? देव तुमच्याकडे काय मागतो? चला तर मी तुम्हाला सांगते. भगवत गितामध्ये श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती त्यांना प्रेम, भक्ती आणि अपुलकीने फळ, फूल, पाणी किंवा एखाद्या झाडाचं पान जरी तुम्ही देवाला अर्पण केलं तर तो भक्त श्रीकृष्णासाठी प्रचंड प्रिय असतो, असं या व्हिडीओमध्ये दिविजा फडणवीस म्हणताना दिसत आहेत.

नेमकं काय म्हणाल्या दिविजा फडणवीस?

‘हरे कृष्ण, आपण सर्वजण देवाकडे काय मागत नाहीत? देवा हे काम कर, देवा ते काम कर परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? देव तुमच्याकडे काय मागतो? चला तर मी तुम्हाला सांगते. भगवत गितामध्ये श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती त्यांना प्रेम, भक्ती आणि अपुलकीने फळ, फूल, पाणी किंवा एखाद्या झाडाचं पान जरी तुम्ही देवाला अर्पण केलं तर तो भक्त श्रीकृष्णासाठी प्रचंड प्रिय असतो. त्यामुळे असा अर्थ बिलकून नाहीये की, तुम्हाला देवाचा सर्वात प्रिय भक्त होण्यासाठी खूप सारे फळ किंवा फूल अर्पण करण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सांगू इच्छितात की, या जगात त्यांच्यासाठी तुमचं प्रेम आणि भक्तीपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला या श्रीकृष्ण जन्माष्टमीला विनंती करते की, थोडा वेळ काढून देवाकडे भौतिक सुख देणाऱ्या गोष्टी मागू नका. परंतु तुम्ही भगवान श्रीकृष्णावर प्रेम करा. तुम्ही त्यांची अपुलकीने आणि प्रेमाने भक्ती करा, साधना करा, आणि त्यांचं चिंतन करा. हरे कृष्णा’ असं दिविजा फडणवीस यांनी म्हटलं आहे.  त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us