मान्सूनचा पहिला अंदाच चुकला, आता नवी तारीख आली, केरळममध्ये या तारखेला धडकणार?

दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज चुकीचा ठरला.

| Updated on: May 27, 2026 | 9:56 PM
1 / 5
आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीच्या अगोदरच्या कामाला वेग आला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात मान्सून कधी एकदा दाखल होतो, याची सगळेच वाट पाहात आहेत.

आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीच्या अगोदरच्या कामाला वेग आला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात मान्सून कधी एकदा दाखल होतो, याची सगळेच वाट पाहात आहेत.

2 / 5

दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळल्याने हा अंदाज चुकीचा ठरला.

3 / 5

आता मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. मान्सून येण्यास उशीर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. म्हणजेच महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन उशिरानेच होऊ शकते. सध्या आलेल्या ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून येण्यासाठी 2 ते 4 जूनची वाट पाहावी लागू शकते.

4 / 5

म्हणजेच मान्सून भारतात दोन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनीही थोडी वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात शेतकऱ्यांनी आपली पेरणीपूर्व कामे पूर्ण करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5

26 मे रोजीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 मे रोजी भारतात मान्सून दाखल झाला आहे, हे जाहीर करण्यास पुरेसे निकस नव्हते. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रातच रेंगाळल्याने मान्सूनला उशीर झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us