..नेमका तोच क्लिपचा भाग, कदमांनी माझ्याआधी का व्हायरल केला?, जरांगे यांचा सवाल
आज कोण कुठे फुटला आहे, कोण कोणासोबत आहे, हे कळायला तयार नाही. मराठा सेवक जर आपण तयार केले तर आपण बेफिकीर राहू. मराठा सेवकाची मोठी फळी तयार करणार आहोत आपण असेही जरांगे यावेळी म्हणाले.

आम्ही इमानदारीने काम करायचं आणि आमच्यासोबत तुम्ही जीव घेणे डाव टाकायचे, आम्ही आरक्षण मागितले, तुम्ही प्रचंड स्वरूपाच्या अडचणी उभा केल्या. आता पडद्यामागचं बाहेर काढलं आहे की हे कशी प्लॅनिंग करू शकतात. आता आंदोलनाला एकवेळ उशीर झाला तरी चालेल पण, आपल्याला राज्यभरात कट्टर मराठ्याची मजबूत फळी उभा करावी लागणार आहे असे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काल ऑडिओ क्लिप बॉम्ब टाकल्याने महायुतीत भांडणे लागली आहेत. आज यावर बोलताना मनोज जरांगे पुढे म्हणाले आज सुद्धा हे आमच्यावर आरोप करत सुटले आहेत. त्यांच्यात जे सुरु आहे हा त्यांच्या भाग आहे. आम्ही काय तुमचे वाईट केले होते,की म्हणून तुम्ही आमच्या विरोधात एवढं षडयंत्र रचले आहे. आज सुद्धा तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. आमच्या समाजाचा आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही का षडयंत्र उभे केले आहे. पडद्याच्या पाठीमागं काय होत आहे, हे कोणाला माहित नव्हतं. आपण राज्याला दाखवून दिलं आहे. या दुनियेत सरळ माणसाचं जगणं खूप अवघड झालं आहे असेही जरांगे पाटील यावेळी भावूक होत म्हणाले.
गरिबांच्या पोरांचा आयुष्य उद्वस्थ करण्यासाठी तुम्ही काम करत आहात. आता मराठा समाजाने आपल्या जवळचा कोण आहे ? हे ओळखलं पाहिजे. मराठा सेवकांची नवीन चांगली फळी मराठा समाजाला आता बांधावी लागणार आहे, आणि त्यानंतर आंदोलनात उतरावं लागणार आहे आणि ते काम मी दोन-तीन दिवसात सुरू करणार आहेत.
माझ्याआधी ही क्लिप कदम यांनी का व्हायरल केली ?
रामदास कदम विनाकारण का बोलतो ?, हे शिंदे साहेबांसाठी महत्वाचे आहे. रामदास कदम यांना कोण सांगत की बाथरूममध्ये मी काय खातो? गावातून काढून दिले. हे सगळं पुढ आलं पाहिजे असे रामदास कदम यांच्यावर टीका करताना जरांगे पुढे म्हणाले की ही क्लिप माझ्या अगोदर रामदास कदम यांनी व्हायरल केली, एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले हीच क्लिप त्यांनी का व्हायरल केली असाही सवाल जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
प्रसाद लाडला जी भूमिका घ्यायची ती त्यांनी घ्यावी. आज ती वेळ नाहीए. पडद्याच्या पाठीमागे कट शिजला जातो, हे मोडीत काढण्यासाठी आपल्याला काम करणे गरजेच आहे. मराठा समाजावरचा अन्याय रोखण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावं लागणार आहे. राज्यातील प्रत्येक विभागात मराठा सेवकांची फळी तयार करावी लागणार आहे. मराठा सेवाकांना एक व्हॉट्सअप नंबर दिला जाणार आहे असेही ते यावेळी म्हणाले.
कोण फुटला हे कळत नाही…
आता कोण फुटला आहे आणि कुठे गेला आहे हे काही कळत नाहीए. कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करणार आहोत. या रेकॉर्डिंगमधून मी खूप शहाणा झालो आहे, मराठा समाजाने देखील शहाने व्हावं. आंदोलन चार दिवस उशीरा करू, परंतु मराठा सेवकांची फळी तयार करणार, समाज संकटातून बाहेर काढायचा आहे म्हणून फळी तयार करणार आहे.