जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

जरांगे यांच्या उपोषणाला १६ दिवस पूर्ण झाले असून त्यांच्या उपोषणा संदर्भात जरांगे समर्थक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल
Manoj Jarange Patil - MP Omraje Nimbalkar
| Updated on: Sep 13, 2026 | 11:27 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवालीत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला १६ दिवस पूर्ण झाले आहेत. जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना सणासुदीत मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही. जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. अशात आता जरांगे यांच्या उपोषणस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट का दिली नाही ? असा जाब एका मराठा तरुणाने त्यांना विचारल्याची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लीपच्या सत्यते संदर्भात टीव्ही नाईन चॅनलने दुजोरा देत नाही. मात्र, या ऑडिओ क्लीपमुळे खासदार ओमराजे निंबाळकर चर्चेत आले आहेत. काय आहे या क्लीपमध्ये वाचूयात…

खासदार ओमराजे निंबाळकर यांना सवाल करणारी एका तरुणाची ( जरांगे समर्थक) ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात हा तरुण ओमराजे यांना म्हणतो की “१४ दिवस झाले, तुम्ही जरांगे पाटील यांना भेटायला का गेले नाही? या जरांगे यांच्या समर्थक तरुणाच्या सवालावर ओमराजेंनी त्या तरुणाला उत्तर दिले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे या उपोषणाला आज 16 दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका जरांगे समर्थक तरुणामधील फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये, “१४ दिवसांपासून उपोषण सुरू आहे, मात्र जरांगे पाटील यांना तुम्ही भेटायला गेले नाहीत,” असा सवाल संबंधित तरुण खासदार ओमराजे निंबाळकर यांना करताना ऐकायला येत आहे. त्यावरुन ओमराजे यांनी आपण अकरा वेळा जाऊन भेटून आलोय, तेव्हा दिसलं नाही का?” अशा शब्दांत या तरुणाला उत्तर दिल्याचे क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. त्यावर या तरुणाकडून पुन्हा त्यांना सवाल केला जातो की, “मात्र तुम्ही सुरु असलेल्या या उपोषणाच्या टप्प्यात जरांगे पाटील यांना भेटायला का गेले नाहीत?”

कैलास पाटील गेले होते

त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी “कैलास पाटील गेले होते, आम्ही पण जाणार आहोत,” असे म्हटल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. यावर संबंधित मराठा तरुणाने “तुम्ही शिंदे शिवसेनेत आणि कैलास पाटील ठाकरे शिवसेनेत आहेत, हे कसं चालणार?” असा सवाल केल्याचे ऐकायला येत आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपच्या सत्यते संदर्भात tv9 मराठी चॅनलने दुजोरा देत नाही. मात्र, क्लिपमुळे ओमराजे निंबाळकर आणि मराठा आंदोलनाच्या त्यांच्या भूमिकेवरून चर्चा रंगली असून ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us