नाना पटोले काय माझे मालक आहेत का? घरवापसीबद्दल मी कुठे बोललो का?, एक पुरावा दाखवा, अशोक चव्हाण यांचा संतप्त सवाल
नाना पटोले काय माझे मालक आहेत का ? अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांना नाना पटोले यांच्यावरुन प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी हे संतप्त उत्तर दिले आहे.

अशोक चव्हाण घरवापसी करणार आहेत का? या प्रश्नावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली होती. नाना पटोले म्हणाले होते की, महत्वाच्या काळात अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले होते, त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. पण अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाचा निर्णय शेवटी पक्षश्रेष्टी घेतील असेही पटोले म्हणाले होते. त्यावर अशोक चव्हाण यांना विचारले असताना ते संतापले आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आपण कधी काँग्रेस प्रवेशाबाबत बोललो का? एक पुरावा मला दाखवा असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण हे आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर भाजपाच्या आश्रयाला आले. त्यांचे वडिल शंकरराव चव्हाण हे काँग्रसेचे दिग्गज नेते होते. त्यांनी महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री पद भूषवले होते. तर केंद्रातही ते मंत्री होते. शंकरराव चव्हाण यांनी नांदेडचे नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री असा प्रवास केला होता. १९७२ ते ७७ पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुन्हा ते १९८६ ते १९८८ या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्याचे पूत्र अशोक चव्हाण हे २००८ ते २०१० पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते आदर्श घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. नंतर साल २०१४ मध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपात आले.