किल्ल्याच्या गेटजवळ केक कापला अन् 3 लेकरांना… अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक खुलासा

कुस्तीच्या खेळाडू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह धक्कादायक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. अश्विनी यांच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे यावरून दिसतंय.

किल्ल्याच्या गेटजवळ केक कापला अन् 3 लेकरांना... अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक खुलासा
Ashwini Paul
| Updated on: Sep 04, 2026 | 1:36 PM

श्रीराम क्षीरसागर धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली. धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर घडललेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. कुस्तीच्या खेळाडू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली. यादरम्यानच आता गंभीर आरोप केली जात आहेत. अश्विनी पौळ यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून अश्विनी मोठ्या त्रासात होती. सासरच्या मंडळीकडून अतोनात त्रास तिला दिला जात होता. एका राष्ट्रीय कुस्ती खेळाडूवर ही वेळ आली. नवऱ्याकडून सातत्याने मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तीन महिन्यांपासून मोठा कलह आयुष्यात सुरू होता. आता या प्रकरणात मोठी माहिती पुढे येतंय. आपल्या तीन लेकरांना किल्ल्यावर घेऊन जाताना अश्विनी पौळ यांनी अगोदर किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ केक कापला.

तो केक आपल्या लेकरांना खाऊ घातला. त्यानंतर किल्ल्यावर जाऊन हा धक्कादायक निर्णय घेतला. अश्विनी पौळ या आपल्या मुलांना किल्ला दाखवण्यासाठी घेऊ आल्या. पण त्यांच्या मनात काही वेगळेच सुरू होते. पूर्ण कुटुंब केक आपल्यासोबत घेऊन आले होते. यादरम्यान तेथील कर्मचाऱ्याने अश्विनी पौळ यांना सांगितले की, केक घेऊन किल्ल्यावर जाता येत नाही.

त्यावेळी अश्विनी प्रवेशव्दारावरच केक कट केला आणि अश्विनी आपल्या लेकरांना घेऊन किल्ल्यावर गेल्या. या घटनेची माहिती मिळताच अश्विनी यांच्या आई वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हंताळ गावचे सरपंचही यावेळी पोहोचले. पोलिस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत. अश्विनी यांच्या मनात नक्की काय सुरू होते, हे यावरून स्पष्ट दिसते.

काही महिन्यांपूर्वीच अश्विनी यांनी मुंबईतील नोकरी सोडली होती. मुंबईतील नोकरी सोडून त्या मागील तीन महिन्यांपासून आपल्या माहेरीच राहत होत्या. यावेळी सासरच्या मंडळींकडून त्यांना त्रास दिला जात होता. अश्विनी यांचा पती रिक्षाचालक असल्याची माहिती मिळतंय. मुंबईतील नोकरी सोडण्यासाठी दबाव पतीनेच टाकल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. सासरच्या चार लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us