दांडीया खेळताना तरुण खाली कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गेले..

भाईंदर पश्चिम येथील लोटस नवरात्रोत्सवात गरबा खेळताना एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दांडीया खेळताना तरुण खाली कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गेले..
Meet Rupda has died following a heart attack
| Updated on: Oct 20, 2026 | 10:58 PM

नवरात्री उत्सवाचा जल्लोष आणि तरुणाईचा बेफामपणा याचा उत्साह गेले नऊ दिवस देशभरात सुरु होता.अनेक ठिकाणी जागृत देवीच्या स्थानावर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक शहरात रास गरबा आणि दांडिया उत्साहात तरुणाई जल्लोषात रमली होती. सगळीकडे आज विजया दशमीचा सण साजरा करत असताना ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर शहरात नवरात्रीत दांडीया खेळताना एका तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भाईंदर येथे नवरात्रीत गरबा खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ३० वर्षीय युवक मीत रुपडा हा जागीच कोसळला. या तरुणाला रात्री साडे अकराच्या सुमारास हा झटका आला. त्यावेळी तेथील त्यांच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण बचावू शकले नाहीत. भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्लीतील पूनम अपार्टमेंट येथे मीत त्याच्या आई-वडिलांसह राहत होता. रात्री तो भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या लोटस नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी गेला होता. रविवारी रात्री दांडीया खेळताना अचानक छातीतून कळा येऊ लागल्या. त्यानंतर तो जमीनीवर कोसळला. त्याला तातडीने भाईंदरच्या तुंगा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. त्याच्या मृत्यूने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading...

मीत याचा हृदयविकारानेच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मीत हा रियल इस्टेट व्यवसायात होता. त्याची प्रकृती चांगली होती आणि ज्ञात असा कोणताही मोठा आजार नव्हता. मात्र,त्याचा अशा प्रकारे अचानक हृदयविकाराने मृत्यू झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. अशा प्रकारे एका तरुणाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसह निकवर्तीय आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us