आंदोलनासाठी तरुणांना 3 हजार रुपये दिले जातात, जयकुमार गोरेंचा आरोप, काँग्रेसे थेट चॅलेंजच दिलं, राजकारण तापलं

विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर आता मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.   आंदोलनात सहभागी तरुणांना रोज तीन हजार रुपये दिले जातात, असा मोठा दावा गोरे यांनी केला आहे.

आंदोलनासाठी तरुणांना 3 हजार रुपये दिले जातात, जयकुमार गोरेंचा आरोप, काँग्रेसे थेट चॅलेंजच दिलं, राजकारण तापलं
Jaykumar Gore
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 9:08 PM

राज्यात सध्या विविध विषयांवरून आंदोलनं सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार  रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या वतीने देखील आंदोलनं सुरूच आहे. विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर आता मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.   आंदोलनात सहभागी तरुणांना रोज तीन हजार रुपये दिले जातात, असा मोठा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. तसेच भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न परकीय शक्तींकडून सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी जोरदार पलटवार देखील केला आहे.

नेमकं काय म्हणाले गोरे?

Loading...

आता आंदोलनाचा रेट देखील वाढला आहे. परवा आपण बघितलं टीव्हीला विरोधकांचं आंदोलन सुरू होतं, तेव्हा एका तरुणाची मुलाखत घेतली, त्याला म्हटलं की तीन दिवस झाले तु इथेच दिसतोय, तेव्हा तो म्हणाला इथे आल्यावर एका दिवसाचे तीन हजार रुपये मिळतात मग घरी बसून तरी काय कारयचं? रोज तीन हजार रुपये, आपल्याला मिळाले तर आपण कायमचे तिकडे जाऊ असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान जयकुमार गोरे यांच्या या विधानावर अतुल लोंढे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

लोढे नेमकं काय म्हणाले?

पहिला तर माझा या गोष्टीवर आक्षेप आहे. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हे तुम्ही जे अपयशी ठरलेले आहात, किंवा जाणीवपूर्वक महाराष्ट्रात नोकरभरती नाही केली, पेपर लीक केले आणि त्यालाच पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहात, त्याचीच ही प्रतिक्रिया आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तीन हजार रुपये देऊन विद्यार्थी येतात, मी तुम्हाला रोजचे तीन हजार रुपये देतो, तुम्ही या आणि आंदोलनाला बसा, असं काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us