Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टीला 2 जबर धक्के; आशुतोष रांका अन् सौरभ दास तुरुंगात, आता अभिजीत दिपके काय करणार?
कॉक्रोच जनता पार्टीला 2 जबर धक्के बसले आहेत. एकीकडे आशुतोष रांका, सौरभ दास तुरुंगात आहे. त्यामुळे अभिजीत दिपके या भूमिका घेणार , याकडे लक्ष लागलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीला सोमवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले आहेत. खरंतर कॉक्रोच जनता पार्टी आधीच अडचणीत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यांचं प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आलं आहे. दोघांना जामीन देण्यात हेतूपूर्वक उशीर केला जात असल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे. त्यामुळे अभिजीत दिपके हे दोघे बाहेर आल्यानंतरच पुढील रणनिती आखणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीन 10 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन केलं. परंतु विमानातच आशुतोष रांका, सौरभ दास आणि अभिजीत दिपकेंना यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आशुतोष रांका, सौरभ दास याना जंतर मंतर झेंडा फडकवणे प्रकरणात 5 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं. यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने कनॉट प्लेसवर तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु त्यांची दुसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली.
पीटीयआच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका, सौरभ दास यांचं प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आलं आहे. दोघांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात कनॉट प्लेस पोलीस स्टेशनमध्ये भारती. न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्येही त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
आता अभिजीत दिपके काय भूमिका घेणार?
कॉक्रोच जनता पार्टीने अद्याप कोणत्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही. दिपकेंनी रविवारी स्पष्ट केलं की, ते सध्या आशुतोष रांका, सौरभ दास यांच्या सुटकेची वाट पाहत आहेत’. त्यांनी पुढे म्हटलं की, आशुतोष रांका, सौरभ दास यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पुढील रणनीती निश्चित केली जाईल. आम्ही काही दिवसांत पाहिलं की, आम्ही आंदोलन केल्यानंतर कशाप्रकारे पोलीस बेकायदेशीररित्या कारवाई करत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे. एक प्रकारे सरकार आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे’.
दीपकेंनी पुढे सांगितलं की, आता कारवाई प्रकरणी वकिलांचा सल्ला घेत आहे. दिपकेंनी शनिवारी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा सल्ला घेतला’. तर त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी रविवारपर्यंत सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची सुटका केली नाही, तर ते कायदेशीर करणार आहेत’. दोघांना हेतूपर्वक जामीन देण्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप दिपकेंनी केला आहे. त्यांच्या सुनावणीत अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.