Abhijeet Dipke : ‘मी तर फक्त ऑर्डर फॉलो करतो’, अभिजीत दीपकेंचा खुलासा, CJP च्या आंदोलनामागच्या खऱ्या नेत्यांची नावं जाहीर
Abhijeet Dipke : "मागच्या काही दिवसात जे झालं, त्यामुळे कुटुंबीय त्रासले असतील. आता काही दिवस आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा. त्यांच्यासोबत राहा. आपण द्वेषाविरुद्ध लढतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो द्वेष आपल्या आतमध्ये येऊ नये"

कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरु असलेली आंदोलनं स्थगित केली आहेत. सीजेपीचे सह संस्थापक आशुतोष रांका आणि सौरभ दास सध्या तुरुंगात आहेत. अभिजीत दीपके यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या युवकांना आवाहन केलय की, सध्या सणांचा काळ असून त्यांनी आपल्या कुटुंबसासोबत वेळ घालवावा. ‘कॉकरोचों’के नाम नावाचा एक व्हिडिओ संदेश त्यांनी प्रसारीत केला आहे. अभिजीत दीपकेने यावेळी एक वेगळी गोष्ट सांगितली. “मी आंदोलनाचा खरा नेता नाहीय. तो केवळ ऑर्डर फॉलो करतो. या आंदोलनाचा खरा लीडर कोणी दुसराच आहे”
“हे आंदोलन खऱ्या अर्थाने कोणी पुढे नेलं असेल तर ते आशुतोष रांका आणि सौरभ दास आहेत. त्यांचा खूप मोठा रोल राहिला आहे. मी तर फक्त त्यांच्या आदेशावर चालत होतो. माझं काम फक्त आशुतोष आणि सौरभच्या ऑर्डर फॉलो करणं होतं. बाहेर लोकांना वाटतय की मी लीडर आहे. पण मी लीडर नाहीय” असं अभिजीत दीपके म्हणाले. “सौरभ आणि आशुतोष मला सांगायचे की, आज तुला इथे जायचं आहे. हे करायचं आहे, मी निमूटपणे त्यांचं ऐकायचो. निर्णय घेण्याची त्यांच्यात जी क्षमता आहे, ती माझ्यापेक्षा चांगली आहे” सौरभ आणि आशुतोष या दोघांबद्दल बलताना अभिजीत दीपकेचे डोळे पाणावले. आशुतोष आणि सौरभ दास तुरुंगात गेल्यानंतरही दीपके कुटुंबीय अजिबात कमकुवत झालेले नाहीत. उलट त्यांनी अभिजीत दीपकेचा आत्मविश्वास आणखी वाढवला. त्याच्यासोबत उभे राहिले.
सगळा देश त्यांना सलाम करेल
“जो सत्याग्रह महात्मा गांधींनी केला, तसाच सत्याग्रह सौरभ आणि आशुतोष करतायत. जेव्हा ते तुरुंगातून बाहेर येतील, तेव्हा सगळा देश त्यांना सलाम करेल. ज्यांना वाटतं की, त्यांना तुरुंगात टाकून घाबरवता येईल तर असं होणार नाही. बाहेर येतील तेव्हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल” असं अभिजीत दीपके म्हणाले.
आपल्याला फसवायचा प्रयत्न होईल, तसचं होतय
“मला माहितीय, तुम्ही बरचं काही सहन केलय. तुमच्यासर्वांचे आभार मानतो. मी आधीच म्हटलेलं की गोष्टी अवघड होतील. आपल्याला सहजतेने काही करु देणार नाहीत. आपल्यामागे पोलीस लावतील. आपल्याला फसवायचा प्रयत्न होईल. तसचं होतय. यानंतरही तुम्ही ज्या एकतेने आणि हिम्मतीने लढताय ते कौतुकास्पद आहे” असं अभिजीत दीपके बोलले.