टायगरवर हल्ल्यानंतर आरोपींचा होता मोठा प्लान, काय होतं पुढचं टार्गेट? राजस्थान पोलिसांकडून मोठा गौप्यस्फोट

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींना राजस्थान पोलिसांनी कोटा रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या १५ मिनिटांत ट्रेनमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे आरोपी दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. या तिघांपैकी एक अल्पवयीन असून, मुंबई पोलीस पुढील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेणार आहेत.

टायगरवर हल्ल्यानंतर आरोपींचा होता मोठा प्लान, काय होतं पुढचं टार्गेट? राजस्थान पोलिसांकडून मोठा गौप्यस्फोट
Rajasthan Police
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 1:41 PM

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनीच टायगरवर हल्ला केल्याचं उघड झालं आहे. राजस्थान पोलिसांनी या तिन्ही आरोपींना कोटा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलं आहे. अवघ्या 15 मिनिटात अख्खी ट्रेन तपासून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांचा नेपाळला पळून जाण्याचा प्लान होता. दिल्ली मार्गे नेपाळला ते तिघे पळून जाणार होते, असा मोठा गौप्यस्फोट राजस्थान पोलिसांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राजस्थान पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. मुंबई पोलिसांनी आम्हाला आरोपी पुणे-जयपूर एक्सप्रेसमधून येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आम्ही त्वरीत कारवाई केली. कोटा पोलिसांनी कोटा रेल्वेस्थानकात अवघ्या 15 मिनिटात संपूर्ण ट्रेन चेक केली. हे आरोपी जनरल डब्ब्यात बसलेले होते. त्यांना लगेच अटक करण्यात आली आहे. या तीनपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र सापडलं नाही. हल्ल्यानंतर त्यांनी या शस्त्राचं काय केलं? याचा तपास करण्यात येत आहे, अशी माहितीही राजस्थान पोलिसांनी दिली आहे.

Loading...

दिल्लीवरून पळण्याचा डाव

या आरोपींना दिल्लीला जायचं होतं. दिल्लीवरून ते नेपाळला पळून जाणार होते. तसेच हे तिन्ही आरोपी सातत्याने अनिल पंडितच्या संपर्कात होते. मुंबई पोलीस या आरोपीचं सतत ट्रॅकिंग करत होते. आम्हाला त्याबाबतच्या वारंवार सूचना दिल्या जात होत्या. त्यानुसार आम्ही कारवाई करून आरोपींना अटक केली आहे, असं राजस्थान पोलिसांनी स्पष्ट केलं.

आरोपींचा ताबा मिळणार

कोटा सिटी पोलिसांनी त्वरीत कारवाई केली आहे. मुंबईची पोलीस टीम आली आहे. त्यांना हँडओव्हर करण्यात येणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही या तिन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या हवाली करणार आहोत, अशी माहितीही राजस्थान पोलिसांनी दिली. आजच ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दोघे हरियाणाचे, एक बिहारचा

या पैकी एक आरोपी 17 वर्षाचा आहे. तो हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील बरोद ठुठान येथील राहणार आहे. तो अल्पवयीन आहे. दुसरा 18 वर्षीय रेहान आहे. तो सोनीपतच्या ईदगाह कॉलोनीतील रहिवासी आहे. रेहानवर अनेक गुन्हे आहेत. त्यात आर्म्स अॅक्टचाही गुन्हा आहे. तिसरा आऱोपी ऋतिक कुमार ऊर्फ रोशन हा 22 वर्षाचा आहे. तो मूळचा बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील पिपराई गावचा रहिवाशी आहे. सध्या तो मुंबईतील अंधेरी पश्चिमेच्या उर्दू शाळेजवळील गिल बर्ली परिसरात राहतो. तो रॅपिडो रायडर आहे. या पैकी दोन आरोपींवर बाईक चोरीचे गुन्हे आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us