युद्धानंतर आता जगावर नवं संकट, कोरोनानंतर चीन बनला नव्या आजाराचा हॉटस्पॉट, देशभरात हाहाकार

मोठी बातमी समोर येत आहे, कोरोनानंतर आता चीनमध्ये एका नव्या आजारानं शिरकाव केला आहे. या आजारानं चीनमध्ये धुमाकूळ घातला असून, नव्या आजारामुळे चीनसोबतच आता जगाची देखील चिंता वाढली आहे.

युद्धानंतर आता जगावर नवं संकट, कोरोनानंतर चीन बनला नव्या आजाराचा हॉटस्पॉट, देशभरात हाहाकार
x jinping
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 7:54 PM

एकीकडे सध्या जग युद्धामुळे मोठ्या संकटात सापडलं आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपू्र्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे आखाती देशांमधून होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला असून, इंधन नसल्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांनी वर्क फॉर्म होम सुरू केलं आहे, तर काही देशांनी चारच दिवसांचा आठवडा केला आहे. दरम्यान या युद्धाची झळ भारताला देखील काही प्रमाणात बसली आहे. भारतात देखील गॅसचा तुटवडा जाणवत असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान व्यावसायिक सिलिंडर देखील वेळत मिळत नसल्यानं अनेक हॉटेल चालकांवर आपलं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

युद्धामुळे आधीच जगावर एक मोठं संकट असताना आता चीनमधून मोठी बातमी समोर येत आहे.चीनमध्ये एक नवा आजार झपाट्यानं पसरत आहे. हा आजार जनावरांना होत आहे, त्यामुळे आता चीन सरकारने खबरदारी म्हणून जनावरं मारण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे, तसेच चीनच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान या आजाराची माणसाला लागण झाल्याचं एकही प्रकरण अद्याप समोर आलं नसल्याचं देखील चीनने म्हटलं आहे. तसेच हा आजार परदेशातून चीनमध्ये आला असा दावा देखील चीनकडून करण्यात आला आहे.

चीनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या आजाराची संगळी लक्षण ही सेरोटाइपची आहेत. त्यावर देशामध्ये लसीकरण उपलब्ध असल्याची माहिती देखील चीनने दिली आहे. हा आजार परदेशातून चीनमध्ये आल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. विशेष: उत्तर पश्चिम चीनमध्ये या आजाराचा प्रचंड उद्रेक झाला आहे.

दरम्यान काही वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला होता. कोरोनाचा प्रसार देखील चीनमधूनच झल्याचं बोललं जातं. त्यानंतर आता चीनमध्ये या नव्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये जनावरं मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या आजारामुळे चीनवर मोठं संकट निर्माण झालं आहे.

Follow Us