Amit Shah : राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, त्यांना आत्मचिंतनाची गरज; अमित शहांचे टीकास्त्र

अमित शहांनी राहुल गांधींच्या 'एसआयआर'वरील आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. गुजरातसह अनेक राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपच्या विजयांचा दाखला देत, शहांनी राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे ठरवले. भाजपच्या प्रचंड यशाने हे आरोप निराधार असल्याचे सिद्ध होते, असे शहा म्हणाले. राहुल गांधींनी वस्तुस्थिती स्वीकारण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Amit Shah : राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, त्यांना आत्मचिंतनाची गरज; अमित शहांचे टीकास्त्र
| Updated on: Oct 13, 2026 | 8:02 PM

एसआयआरच्या मुद्द्यावरून (SIR) देशात राजकारण चांगलंच तापलेलं आहे. इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. एसआयआरच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत टीका केली आहे. ते म्हणाले, “ मला राहुल गांधींना विचारायचं आहे की, गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव एसआयआरमुळे झाला का?”. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला आहे. 41 वर्षांत काँग्रेस  गुजरातमध्ये एकदाही जिंकली नाही. त्यामुळे राहुल गांधींना आत्मचिंतनाची गरज आहे, असा सल्ला शाह यांनी दिला. राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे आहेत, असंही पुढे अमित शाह यांनी म्हटलं.

काय म्हणाले अमित शाह ?

Loading...

अमित शाह म्हणाले की, “ एका मोठ्या राज्यात, जिथे एकेकाळी तुमची सत्ता होती, तिथे गेल्या 41 वर्षांत तुम्हाला एकही निवडणूक जिंकता आलेली नाही. हा असा विषय आहे, ज्यावर राहुल गांधी यांनी गांभीर्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे.” ते पुढे म्हणाले की, अलीकडेच पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या तीन ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, हे मला आज देशातील जनतेला सांगायचे आहे. नौगावमध्ये भाजपच्या उमेदवाराने 1 लाख 42 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. भाजपने काँग्रेसकडून ही जागा हिसकावून घेतली.

2029 मध्ये चौथ्यांदा हरण्याची तयारी ठेवा 

नंदीग्राममध्ये भाजपच्या उमेदवाराला 76 टक्के मते मिळाली आणि 1 लाख 22 हजार मतांची मोठी आघाडी मिळाली. पश्चिम बंगालमधील रेजीनगरमध्ये भाजपने 75 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवत तृणमूल काँग्रेसकडून ही जागा जिंकली, असं त्यांनी पुढे सांगितलं. तर पुद्दुचेरीमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एआयएनआरसीच्या (AINRC) एनडीए उमेदवाराने 8482  मतांच्या फरकाने विजय मिळवला. काँग्रेसला केवळ 22 टक्के मते मिळाली.  “ 2029 मध्ये चौथ्यांदा पराभवाला सामोरे जाण्याची तयारी राहुल गांधी यांनी आतापासूनच ठेवावी” असं म्हणत शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचंड विजय मिळवला आहे. महानगरपालिकांपैकी ९० टक्के महानगरपालिकांवर भाजपने सत्ता मिळवली आहे. नगर परिषदांपैकी ६६ टक्के नगर परिषदांवर, तर नगरपालिकांपैकी ६५ टक्के नगरपालिकांवर भाजपने विजय मिळवला आहे. हे निकाल राहुल गांधी यांच्यासाठी एक धडा आहेत, असे अमित शाह म्हणाले. ते पुढे म्हणाले, “राजस्थानमध्ये आम आदमी पक्षाच्या ८५ टक्क्यांहून अधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

मी राहुल गांधी यांना हेही सांगू इच्छितो की, त्रिपुरामध्ये ग्राम समित्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण ४,६०० जागांपैकी ३,२४८ जागा आणि अन्य ९०० जागा, अशा मिळून एनडीएला सुमारे ४,००० हून अधिक जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच, एनडीएला ७७.५ टक्के मतांचा वाटा मिळाला आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us