Asha Bhosle last rites LIVE : आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेताना रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर

Asha Bhosle last rites LIVE Coverage and Updates in Marathi : लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. याबद्दल अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग

Asha Bhosle last rites LIVE : आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेताना रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर
गायिका आशा भोसले
| Edited By: | Updated on: Apr 13, 2026 | 12:05 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 13 Apr 2026 12:04 PM (IST)

    आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेताना रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर

    दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनाला उद्धव ठाकरे सपत्नीक रश्मी ठाकरेंसोबत उपस्थित. त्यांनी मंगेशकर कुटुंबाचं सांत्वन केलं. आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेताना रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर.

  • 13 Apr 2026 11:54 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण..

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहेय.  सोन्याच्या दरात 1 हजार आणि चांदीच्या दरात 4 हजारांची घसरण झाली असून  जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचलेत. तर जीएसटीसह चांदीची किंमत 2 लाख 48 हजार 230 रुपये इतकी आहे.

  • 13 Apr 2026 11:43 AM (IST)

    कल्याण जवळील रायते पुलाजवळ भीषण अपघात, 7 – 8 जण जखमी

    कल्याण जवळील रायते पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे.  मुरबाड हुन कल्याणच्या दिशेने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या इको गाडीचा अपघात झाला असून

    सात ते आठ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना मुरबाडच्या रुग्णालयात नेण्यात आलं असून टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • 13 Apr 2026 11:29 AM (IST)

    आशिष शेलार, राज्यापालांनी घेतलं आशा भोसले यांचं अंत्यदर्शन

    ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा काल ब्रीचं कँडी रुग्णालयात निधन झालं. आज दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.  आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा यांनी आशा भोसलेंचं अंत्यदर्शन घेतलं.

    राज्यपाल जिष्णू देव वर्मा, अभिनेता रितेश देशमुख हेही आशा भोसलेंचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले.

  • 13 Apr 2026 11:23 AM (IST)

    मीना मंगेशकर यांनी घेतलं आशा भोसले यांचं शेवटचं दर्शन

    आशा भोसले यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून, त्यांची बहीण मीना मंगेशकर यांनी अखेरचं दर्शन घेतलं. तसेच अभिनेत्री वहिदा रहमान , राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही अंत्यदर्शन घेऊन आशा भोसले यांना आदरांजली वाहिली.

     

  • 13 Apr 2026 11:16 AM (IST)

    ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमण्यास सुरूवात

    आशा भोसले यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली आहे.  पोलिसांकडून चाहत्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • 13 Apr 2026 10:56 AM (IST)

    सुदेश भोसले, सचिन तेंडुलकरने घेतले आशा भोसलेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

    आशा भोसले यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. नुकतंच गायक सुदेश भोसले, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

  • 13 Apr 2026 10:46 AM (IST)

    भोंदू अशोक खरात प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी; SIT चे पुढील पाऊल काय?

    भोंदू बाबा अशोक खरात याच्या तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला व्हीसीद्वारे (Video Conferencing) न्यायालयात हजर केले जाणार आहे. गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खरात सध्या कोठडीत होता. तर आता चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटी (SIT) कडून न्यायालयात अधिकृत पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते, खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत होते की त्याला पुन्हा पोलीस कोठडी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 13 Apr 2026 10:37 AM (IST)

    आशा भोसले यांना मुंबई पोलिसांकडून श्रद्धांजली, उपस्थितांना अश्रू अनावर

    आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहे. शिवाजी पार्काच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. सध्या त्यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित कुटुंबियांसह सर्वांना अश्रू अनावर झाले

  • 13 Apr 2026 10:36 AM (IST)

    नक्षत्राचे देणे ते लक्ष्मीचं नाणं, ढोलकी वादकाने सांगितली आशा भोसलेंची आठवण

    ‘नक्षत्राचे देणे’ या कार्यक्रमात ढोलकी वादक म्हणून काम करत असतानाचे असंख्य क्षण आजही माझ्या स्मरणात आहेत. ताईंच्या गाण्यासाठी आम्ही इथेच रिहर्सल करायचो. ताईंना आम्ही प्रेमाने ‘आई’ म्हणायचो. त्यांनी मला दिलेले लक्ष्मीचं नाणं हीच त्यांच्यासोबतची माझी सगळ्यात मोठी आणि मौल्यवान आठवण आहे. त्यांच्या जाण्याने संगीताच्या विश्वाची मोठी हानी झाली असून, त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणं नाही, अशा शब्दांत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

  • 13 Apr 2026 10:28 AM (IST)

    आशा भोसलेच्या पार्थिवाचे उद्धव ठाकरे घेणार अंत्यदर्शन

    आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आशा भोसलेंच्या पार्थिवाचे त्यांच्या राहत्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेणार आहेत. या कठीण प्रसंगी ठाकरे कुटुंब त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधून त्यांना सांत्वन देणार असून, आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

  • 13 Apr 2026 10:23 AM (IST)

    आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग कसा असणार? माहिती समोर

    आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग कसा असेल याची माहिती समोर आली आहे. कासा ग्रँड एक्झिट गेट- डावे वळण- पेनिन्सुला सिग्नल -उजवे वळण -गणपतराव कदम मार्ग -श्रीराम नाका -वरळी नाका- उजवे वळण डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग -पोद्दार जंक्शन- ग्लॅस्को जंक्शन-सास्मिरा जंक्शन- हार्डीकर जंक्शन -सेंचुरी जंक्शन- किस्मत जंक्शन- हत्तीचा पुतळा -सिद्धिविनायक मंदिर- काशिनाथ धुरू- कीर्ती कॉलेज- सूर्यवंशी हॉल- डावी वळण-स्मशान भूमी, असा आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग असणार आहे.

  • 13 Apr 2026 10:18 AM (IST)

    शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? संजय राऊतांचा सवाल

    शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का, तुम्ही कितीही मोठे झालात, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये, असे संजय राऊत म्हणाले

  • 13 Apr 2026 10:06 AM (IST)

    आशा भोसलेंच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि मजेशीर अंदाज कधीच दूर झाला नाही – संजय राऊत

    लतादीदी गेल्या, आता आशाताई गेल्या, पण त्यांच्या बाबतीत एका युगाचा अंत असं म्हणणं योग्य नाही. मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्राचा एक भाग आहे. ते कधीच दूर होणार नाही. त्यांनी आयुष्यात प्रचंड संघर्ष घेतला. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि मजेशीर अंदाज कधीच दूर केला नाही, असे संजय राऊत म्हणाले

  • 13 Apr 2026 09:55 AM (IST)

    धाराशिवात शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाराज शिवसैनिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५० शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. या कारवाईमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.आज हे सर्व कार्यकर्ते खासदार श्रीकांत शिंदे यांची सोलापूर येथे भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.

  • 13 Apr 2026 09:40 AM (IST)

    32 हजार किलो भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आणि मावळ तालुक्यातील उरसे येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 32 हजार किलोचा मँगो पल्पचा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • 13 Apr 2026 09:18 AM (IST)

    सोलापूरकरांसाठी आणखी एक वंदेभारत ट्रेन मिळणार

    सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.  सोलापूरसाठी आणखी एक वंदेभारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. पुणे, मुंबईला जाण्यासाठी सोलापूरकरांना एक नवीन पर्याय मिळाला आहे. रेल्वे बोर्डाकडून नवीन स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता मिळाली आहे. – बंगळुरू ते मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावणार आहे.

  • 13 Apr 2026 09:06 AM (IST)

    प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार

    भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे २३ एप्रिल रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. आता निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली आहे. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

  • 13 Apr 2026 08:52 AM (IST)

    नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण

    नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कॉर्पोरेट जिहादप्रकरणी कंपनीतील ६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  अटकेत असलेल्या ६ आरोपींवर IT कंपनीने कारवाई केली आहे. महिला कर्मचारी लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी आत्तापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • 13 Apr 2026 08:40 AM (IST)

    उत्पादन घटल्याने बासमती तांदळाचे दर वाढण्याची शक्यता

    पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्यातीत अडथळे येऊनही बासमती तांदळाची जागतिक मागणी कायम आहे. उत्पादनात सुमारे ८% घट आणि वाढते वाहतूक खर्च यामुळे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंजाबसह उत्तर भारतातील उत्पादन घटले असताना निर्यात ६५ लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बाजारात दर वाढीचे संकेत दिसत आहेत.

  • 13 Apr 2026 08:35 AM (IST)

    आशा भोसले यांच्या अखेरच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था

    आशा भोसले यांच्यावर आज म्हणजे 13 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. सांस्कृतिक आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज आशाताईंच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे; चाहते येऊन श्रद्धांजली वाहू शकतात.”

  • 13 Apr 2026 08:29 AM (IST)

    जॅकी श्रॉफ आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल

    जॅकी श्रॉफ यांनीही आशा भोसले यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर, अभिनेत्याने तिथे पोहोचून दिवंगत गायिकेला श्रद्धांजली वाहिली.

  • 13 Apr 2026 08:25 AM (IST)

    आशा भोसले यांच्या निधनावर अभिनेता सनी देओल याने देखील केलं  दुःख व्यक्त 

    आशा भोसले यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘आशा ताईंचा आवज कायम आपल्यासोबत राहील… ओम शांती…’

  • 13 Apr 2026 08:20 AM (IST)

    आशा भोसले यांच्या निधनावर अभिनेता सलमान खान म्हणाला, ‘प्रचंड मोठं नुकसान’

    अभिनेता सलमान खान याने देखील आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आशा ताईंचा एक फोटो पोस्ट करत सलमान खान म्हणाला, ‘भारतीय संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. आशाजींच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं आहे. एक अतुलनीय आवाज, तुमची गाणी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील.’

  • 13 Apr 2026 08:15 AM (IST)

    ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची सखोल पडताळणी सुरू

    अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिक कार्यालय आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.  प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजारमूल्याचा तपास होत आहे.  प्रॉपर्टी जमा करण्यामागील उद्देश काय? याचा शोध सुरू आहे.  बँक खाती सील केल्यानंतर व्यवहारांचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.

  • 13 Apr 2026 08:13 AM (IST)

    आशा भोसले यांच्या निधनावर हृतिक रोशन याच्याकडून शोक व्यक्त

    गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर अभिनेता हृतिक रोशन याने शोक व्यक्त केला आहे. ‘तुमच्या आत्म्याला शांती मिळो…’ असं अभिनेता दुःख व्यक्त करत म्हणाला आहे.

भारतीय संगीत विश्वातील नक्षत्राचं देणं, सुरेल आणि जादूई स्वरांची मल्लिका, महान गायिका आशा भोसले या आज आपल्यात नाहीत. वयाच्या 92 व्या वर्षी आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे आशाताईंचं निधन झालं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आशाताईंच्या निधनानंतर संगीतविश्वातील एका पर्वाचा अंत झाला. आशाताईंनी तब्बल 12 हजार पेक्षा अधिक गाणी गायली आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त संगीताची सेवा केली… आयुष्यभर संगीत क्षेत्राला वाहून घेणाऱ्या या महान गायिकेला आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून चाहत्यांना आशाताईंचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत… याबद्दल अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग….

Follow Us