पार्टीत जास्त चिकन खाल्लं म्हणून भडकला, मित्रच मित्राच्या जीवावर उठला, अखेर…

कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात चिकनच्या शुल्लक वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची निर्घृण हत्या केली. एका पार्टीत चिकनच्या तुकड्यांवरून वाद विकोपाला गेला, ज्यात अरुण कुमारने सीतारामवर चाकूने वार केले. खुनाला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तपास करत आरोपी अरुण कुमारला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.

पार्टीत जास्त चिकन खाल्लं म्हणून भडकला, मित्रच मित्राच्या जीवावर उठला, अखेर...
chicken piece dispute Crime
| Updated on: Sep 01, 2026 | 8:07 PM

कर्नाटकच्या बेलगावी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पार्टीत चिकन खाण्याच्या शुल्लक मुद्यावरून झालेला वाद पेटला आणि जीवघेणा ठरला. मूड़लगी तालुक्यातील हुनास्याल पीजी गावात तरूणाची त्याच्याच मित्राने निर्घृण हत्या केली. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या या दोन मित्रांचा पार्टीदरम्यान वाद झाला, बघता बघता ते प्रकरण चांगलच तापलं आणि थोड्याच वेळात या भांडणाचा अतिशय रक्तरंजित शेवट झाला. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून गावकरी दहशतीत आहेत.सीताराम असं मृताचं नाव असून त्याला मारणारा आरोपी अरुण कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सीताराम हा उत्तर प्रदेशातील पीलीभीत , कबीरगंज येथील रहिवासी होता. तो त्याचा मित्र अरुण कुमार याच्यासोबत मूड़लगी येथील ‘प्रिया स्टील कंपनी’मध्ये काम करत होता. दोन्ही मित्र मिळून एक्तर पार्टी करत होते. त्याचवेळी ताटलीत ठेवलेल्या चिकनच्या पीसेसवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. तू माझ्यापेक्षा चिकनचे पीस जास्त खाल्लेस असं म्हणत ते एकमेकांशी भांडू लागले. एवढ्याशा शुल्लक मुद्यावरून झालेलं भांडण बघता बघता खूप वाढलं आणि ते दोघे प्रचंड भडकले. मात्र राग अनावर झाल्याने अरूण कुमार याने चाकू काढला आणि त्याने सीतारामवर सपासप वार केले.

हत्या नव्हे अपघात दाखवण्याचा प्रयत्न

यामुळे सीताराम जखमी होऊन खाली कोसळला. ते पाहून अरूणने सीतारामला उपचारांसाठी लागलीच गोकक (Gokak) सरकारी रुग्णालयात नेलं. मात्र ही हत्या नसून अपघाताने त्याला लागलं, तो इमारतीवरून खाली पडल्याने जखमी झाला, असं आरोपी अरूणने डॉक्टरासमोर आणि पोलिसांसमोर भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र सीताराम याला झालेली जखम पाहून पोलिस आणि डॉक्टरांना संशय आला. रुग्णालयात सीतारामचा मृत्यू झाला.

ताब्यात घेताच दिली गुन्ह्याची कबुली

या घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी रुग्णालय गाठलं आणि अरूण कुमारला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. पोलिसांनी दट्ट्या दाखवताच आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. चिकनच्या मुद्यावरून झालेल्या भांडणात सीतारावर चाकूने वार केल्याचं तक्याने कबूल केलं. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us