गोरखपूरमध्ये हायप्रोफाईल निवडणूक, संन्याशाची किमयागिरी की सपा आणि भीम आर्मीची सरशी?; योगी आदित्यनाथांच्या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष

| Updated on: Jan 21, 2022 | 12:06 PM

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत चालले आहे. आता भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून लढणार असल्याने आता ही निवडणूक हायप्रोफाईल होणार आहे.

गोरखपूरमध्ये हायप्रोफाईल निवडणूक, संन्याशाची किमयागिरी की सपा आणि भीम आर्मीची सरशी?; योगी आदित्यनाथांच्या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष
Chandrashekhar Azad Yogi Adityanath
Follow us on

लखनऊः उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत चालले आहे. आता भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून लढणार असल्याने आता ही निवडणूक हायप्रोफाईल होणार आहे. कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे दिवंगत नेते उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नीला आता समाजवादी पक्षाकडून तिकीट जाहीर झाल्याने या मतदार संघाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

आझाद समाज पार्टीचे सुप्रीमो चंद्रशेखर आझाद यांनी याआधीच योगी आदित्यनाथ यांच्यीविरोधात निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. समाजवादी पक्षासोबत त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला मात्र मागणी केलेल्या जागा देण्यास समाजवादी पक्षाने नकार दिला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाने 100 जागा दिल्या तरी आता युती करणार नाही अशी ठाम भूमिका आझाद समाज पार्टीने घेतल्याने गोरखपूरमधील होणाऱ्या या लढती अधिक रंगतदार आणि चुरशीच्या होणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लढत

उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नीला समाजवादी पक्षाकडून तिकीट जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण उपेंद्र शुक्ला हे योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे विश्वासू नेते होते. या निवडणूकीत शुक्ला यांची पत्नीच योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात असल्याने उत्तर प्रदेशाच्या निवडणूकीत अधिक रंग चढला आहे. तसेच भीम आर्मीचे चंद्रशेखर आझादही गोरखपूरमधून लढणार असल्याने आता मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराला असणार याकडेच लक्ष आहे. चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान अशा विविध ठिकाणा सामान्य माणसांसाठी आवाज उठविल्याने त्यांच्या नावाला मोठे वजन प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत त्यांना समाजवादी पक्षाने जागा त्यांनी मागितल्याप्रमाणे जागा देण्यास नकार दिल्याने त्यांनी पुन्हा सपा बरोबर जाणार नाही अशी भूमिका घेतली.

गेल्या 33 वर्षापासून गोरखपूर हा भाजपचा गड कायम अबाधित राहिला आहे. भाजपने आताही योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगणार आहे.

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? किती लोकांच्या तोंडी राहुल गांधींचं नाव? वाचा ताज्या Survey चे 10 महत्त्वाचे मुद्दे!

UP Elections: योगी आदित्यनाथ विरोधात भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद लढणार, गोरखपूर मतदारसंघात सामना!

दोन दिवसापुर्वी अपर्णा यादव यांचा भाजप प्रवेश, आज घेतला मुलायम सिंह यांचा आशीर्वाद; समाजवादी पक्षात वाढली चिंता