रशियाचा मित्र भारताला मोठा धक्का, थेट चीनसोबत मिळून…, हादरवणारे आकडे समोर

रशिया भारताचा चांगला मित्र आहे, भारताला जेवढी कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील मोठा हिस्सा भारत रशियाकडूनच खरेदी करतो. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हादरून टाकणारी आकडेवारी आहे.

रशियाचा मित्र भारताला मोठा धक्का, थेट चीनसोबत मिळून..., हादरवणारे आकडे समोर
Vladimir Putin
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 7:04 PM

रशिया भारताचा चांगला मित्र आहे. अमेरिकेनं रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर निर्बंध घातल्यानंतर देखील भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाने भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट दिली होती. मात्र अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मूज देखील बंद झालं, त्यानंतर रशियाने भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा तर सुरू ठेवला मात्र कच्च्या तेलावर दिली जाणारी सर्व सूट बंद केली, त्यामुळे भारतावर रशियाकडून प्रिमियम दराने तेलाची खरेदी करण्याची वेळ आली. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियाने भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

चीन आणि रशिया दोन्ही देशांचा द्विपक्षीय व्यापार गेल्या तीस वर्षांमध्ये तब्बल 30 पटीने वाढला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार वाढून 200 बिलियन डॉलरवर पोहोचला आहे. मात्र दुसरीकडे याची तुलना भारतासोबत करायची झाल्यास अजूनही भारताचा रशियासोबतचा द्विपक्षीय व्यापार सत्तर बिलियन डॉलरवरच अडकला आहे, आणि या व्यापारामध्ये देखील तेलाची भागिदारी सर्वात जास्त आहे. सध्या भारत आणि रशियामधील व्यापार 100 बिलियन डॉलरवर पोहचवण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे रशियाचा चीनसोबतचा व्यापार हा तब्बल तीन पटीने वाढला आहे.

रशियासोबतचा चीनचा व्यापार झपाट्याने वाढत आहे, याच कारणामुळे आता रशिया आणि चीनमधील संबंध अधिक मजबूत होत असून, रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामधील जवळीकता देखील चांगलीच वाढली आहे. रशिया आणि चीन हे दोन्ही देश मिळून जगाला जेवढी ऊर्जेची गरज आहेत, त्यातील एक तृतियांश ऊर्जेचं प्रोडक्शन करत आहेत. दुसरीकडे मात्र रशिया आणि भारतामध्ये व्यापार वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील रशियाने भारताला देण्यात येणारी कच्च्या तेलावरची सर्व सूट बंद केली आहे. अमेरिका आणि इरामध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर रशियाकडून हा निर्णय घेण्यात आला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us