CJP ला मोठा झटका, हाय कोर्टातून मोठी बातमी, नेमकं काय घडलं?

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना गुरुवारी दिल्ली हाय कोर्टाने मोठा झटका दिला आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

CJP ला मोठा झटका, हाय कोर्टातून मोठी बातमी, नेमकं काय घडलं?
सीजेपीला मोठा झटका
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 5:08 PM

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना गुरुवारी दिल्ली हाय कोर्टाने मोठा झटका दिला आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी कोणतीही माहिती न घेता तसेच तथ्य तपासून न पहाता भाजपचे नेते आणि ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांच्या संदर्भात केलेली पोस्ट चुकीची होती, असं दिल्ली हाय कोर्टाने म्हटलं आहे. तुम्ही स्वत:हून ही पोस्ट हटवत असाल तर बरं होईल असंही यावेळी न्यायालयाने म्हटलं आहे. गौरव भाटिया यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे, या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना दिल्ली हाय कोर्टाने कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का दिला आहे. कोणतीही माहिती न घेता तसेच तथ्य तपासून न पहाता, अशा प्रकरे पोस्ट करणं चुकीचं आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच तुम्ही स्वत:हून ही पोस्ट हटवत असाल तर बरं होईल असंही यावेळी कोर्टाने म्हटलं आहे.

5 सप्टेंबर रोजी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी ट्विटवर एक पोस्ट केली होती, या पोस्टविरोधात आता गौरव भाटिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. लाईव्ह लॉ च्या एका रिपोर्टनुसार हे सर्व प्रकरण स्वतंत्र भारद्वाजच्या अटकेशी संबंधित आहे. ज्याचा सीजेपीचं आंदोलन सुरू असताना एका अल्पवयीन मुलीसोबत आणि तिच्या वडिलांसोबत वाद झाला होता.

या प्रकरणात सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही सर्व तरुण आहात, तुमची नाराजी असू शकते, मात्र वस्तुस्थिती जाणून न घेता अशा प्रकारे पोस्ट करणं चुकीचं आहे. ती पोस्ट तुम्ही स्वत:हून जर सोशल मीडियावरून हटवली तर चांगलं होईल, आम्हाला ही पोस्ट हटवण्याचा आदेश देण्याची इच्छा नाहीये. तुम्हाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु तथ्य देखील तपासलं गेलं पाहिजे, दरम्यान सुनावणीदरम्यान आम्ही ती पोस्ट ट्विटरवरून डिलिट केल्याची माहिती सीजेपीच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us