ममता बॅनर्जींना मोठा झटका, अखेर गुन्हा दाखल, अडचणी वाढल्या

मोठी बातमी समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकाता येथील हेस्टिंग्स पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जींना मोठा झटका, अखेर गुन्हा दाखल, अडचणी वाढल्या
mamata banerjee
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 4:51 PM

मोठी बातमी समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकाता येथील हेस्टिंग्स पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कोलकाता हाय कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 28 ऑगस्ट शुक्रवारी कोलकाता येथील कॅथेड्रल रोडवर तृणमूल काँग्रेसच्या वतीने एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तृणमूल विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीदरम्यान कोलकाता हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

शुक्रवारी कोलकाता येथील कॅथेड्रल रोडवर तृणमूल काँग्रेसच्या वतीने एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.तृणमूल विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होत. या रॅलीदरम्यान कोलकाता हाय कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आता ममता बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोलकाता हाय कोर्टाकडून या रॅलीसाठी रोडचा फक्त एकच भाग वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी रोडच्या दोन्ही बाजू व्यापून टाकल्या, त्यामुळे या काळात इथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याच प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी दुपारी बारा वाजता सुरू झालेली रॅली तीन वाजेपर्यंत सुरू होती. या तीन तासांमध्ये या रोडवर प्रचंड गर्दी उसळली. कार्यकर्त्यांनीच बॅडिगेट हटवले, तसेच पोलिसांनाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप देखील तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान या एफआयआरमुळे आता ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती समोर येत आहे.

 

Follow Us