बिहारातील हाजीपूरात गंगानदीत बोट बुडाली, ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

बिहार येथील हाजीपुरात गंगानदीत बोट बुडून ११ प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा प्रकार राघोपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्यामचंद गावाजवळ घडला आहे.

बिहारातील हाजीपूरात गंगानदीत बोट बुडाली, ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
bihar boat accident
| Updated on: Oct 13, 2026 | 10:44 PM

बिहार येथील हाजीपुरात गंगानदीत बोट बुडून ११ प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा प्रकार राघोपुर पोलिस ठाण्याच्या श्यामचंद गावाजवळ घडली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार या बोटीत १५ ते २० जण बसले होते. ही बोट उलटल्यानंतर अफरातफरी माजली. या घटनेत बोटीतील ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेतील पाच प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. वैशालीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी  या बोट अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार बोटीवरील सर्व लोक प्रसाद खाण्यासाठी जात होते. त्यावेळी गंगा नदीत ही बोट अचानक उलटली. ही नाव उलटल्याने त्यात बसलेले प्रवासी नदीच्या पाण्यात बुडाली. घटनेची माहिती कळताच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या साक्षीदारांनी स्थानिक आणि प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली त्यानंतर मदतीचे कार्य सुरु झाले आहे. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला आणि बचावासाठी आरडा ओरडा सुरु झाला. त्यानंतर प्रशासनाने धाव घेतली. दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांचे रडून हाल झाले आहेत. पोलिस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहे. मृतांच्या वारसदारांचा शोध घेतला जात असून मृतांना सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठवलले जात आहे.

Loading...

घटनेनंतर घटनास्थळी निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती दाखवणारे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत. अपघातानंतर लोकांचा जमाव जमला असून हे लोक पोलिस आणि पीडितांना मदत करत आहेत. बिहारमध्ये बोट बुडाल्याच्या अनेक घटना अधूनमधून घडत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us