देश हादरला ! तिला जबरदस्ती उचललं, नको तिथे बॅड टच, मित्रासोबत घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य, व्हिडीओ व्हायरल !

Jamui Viral Video Case : जमुईमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला काही समाजकंटकांनी त्रास दिला . एवढंच नमव  तर त्यांनी तिला नको तिथे अयोग्यरित्या स्पर्शही केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बघता बघता हे प्रकरण तापलं. राहुल गांधी यांनीही याप्रकरणी ट्विट केलं आहे. अखेर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. याप्रकरणी पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं. आत्तापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

देश हादरला ! तिला जबरदस्ती उचललं, नको तिथे बॅड टच, मित्रासोबत घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य, व्हिडीओ व्हायरल !
| Updated on: Sep 21, 2026 | 7:04 PM

ना कायद्याचं भय, ना लोकांची, समाजाची काही भीडभाड..रसत्यावरून जाता जाता शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांभोवती लांडग्यांप्रमाणे घुटमळणाऱ्या उर्मट तरुणांचा घोळका.. बिहारच्या जमुई येथून समोर आलेलं हे लज्जास्पद दृश्य पाहून, माणूस म्हणवणाऱ्या कोणाचीही मान शरमेने झुकेल. या व्हिडीओतील ही घटना फक्त प्रशासकीय यंत्रणेलाच हादरवून सोडणारी नव्हे तर सभ्य , सुजाण म्हणवणाऱ्या समाजाच्या प्रतिमेलाही काळीमा फासणारी आहे. 19 सप्टेंबरच्या संध्याकाळी जेव्हा एक अल्पवयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांच्या स्कुटीवर बसून घराच्या दिशेने जात होते, तेव्हा दबा धरून बसलेल्या सहा-सात लोकांनी त्यांना भररस्त्यात बळजबरीने अडवलं. यानंतर त्यांनी त्या निरागस मुलांसोबत जे वर्तन केलं त्याने अख्खा देश दर हादलाच पण पोलिस आणि कायदा-सुव्यवस्थेलाही शरमेने मानही खाली घालायला लागली. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

त्या आरोपींनी केवळ त्या दोन्ही विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करून त्यांना शिवीगाळच केली नाही, तर त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला बॅड टच करत मनात स्पर्शाची घृणा निर्माण होईल, असं त्यांचं वागणं होतं. तिच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा नीच प्रयत्नही त्या आरोपींनी केला. त्या मुलीने हात जोडून त्यांच्यासमोर विनवणी केली आणि दयेची याचना केली, पण त्या नराधम आरोपींचं मन काही द्रवलं नाही. त्यांची क्रूरता तेवढ्यावरच थांबली नाही, या संपूर्ण नीच हरकतीचं त्यांनी व्हिडीओ शूटिंग केलं आणि नंतर आपली कुप्रसिद्धी मिरवण्याच्या उद्देशाने तो व्हिडिओ सोशल मीडियावरही त्यांनी टाकला.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर पोलिसांनी घेतली दखल

बिहारमधील त्या रस्त्यावर घडलेला हा निर्लज्ज आणि घृणास्पद प्रकार इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने पसरला, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. सामाजिक संकोच आणि बदनामीच्या भीतीमुळे त्या पीडितांनी पोलिसांत जात कोणतीही तक्रार नोंदवली नाही, मात्र असं असलं तरीही जिल्हा दंडाधिकारी नवीन यांनी या भयानक घटनेचं गांभीर्य आणि धक्कादायक स्वरूप ओळखलं. त्यांनी या प्रकरणाची त्वरित दखल घेतली आणि पोलीस विभागाला स्वतःहून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, जमुई सदर पोलिसांनी त्या व्हायरल व्हिडिओचा शोध लावण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला. सायबर सेल आणि गुप्तचर सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी संबंधित पीडित विद्यार्थ्यांचा शोध घेतला आणि गोपनीयता राखत आणि संवेदनशीलता बाळगत त्यांच्या घरी भेट दिली, जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर, सदर पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ (POCSO) कायदा आणि बीएनएस (BNS) मधील संबंधित अजामीनपात्र कलमांन्वये अधिकृतरित्या एफआयआर देखील (FIR) दाखल करण्यात आला आहे.

SIT गठित, तीन आरोपींना अटक

त्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत पटापाट सूत्र फिरवली.  त्या व्हिडीओच्या आधारे शोध घेत पोलिसांनी या घटनेतील नराधम आरोपींची ओळख पटवली. या गुन्ह्यात 6 ते 7 तरूण सहभागी असल्याचं तपासातून निष्पन्न झालं. त्यांना शोधून बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाने विविध ठिकाणी छापे टाकले. दरम्यान पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल यांच्या आदेशानुसार, याप्रकरणी एसडीपीओ (SDPO) दीप्ती मोनाली यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं. पोलिसांनी आत्तापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यासाठीही पोलिसांकडून पावलं उचलली जात आहेत.

या प्रकरणातील पीडित विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची मानसिक स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन पीडितांची ओळख उघड करणारे कोणतेही व्हिडिओ शेअर करू नका असं आवाहन पोलिसांनी जनतेला केलं आहे. असा व्हिडीओ शेअर करणं हा कायद्याने गुन्हा आहे.

राहुल गांधींनीही केलं ट्विट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याप्रकरणाची दखल घेतली असून त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us