BJP च्या माजी खासदाराच्या वाहन ताफ्यातील कारचा अपघात, एक जण ठार, एक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे माजी खासदार ग्वाल्हेरवरुन कन्नौज येथे होते. त्यावळी लखनऊ आगरा एक्सप्रेसवेच्या 145 किलोमीटर कट सौरिख ठाण्याच्या सकरावा भागात स्कॉर्ट वाहनाला अपघात झाला आहे. या दुर्घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

कन्नोज जिल्ह्यातून जाणाऱ्या लखनऊ ते आगरा एक्सप्रेसवेवर एक मोठा रस्ते अपघात झाला आहे. कन्नोज लोकसभेचे माजी भाजपा खासदार सुब्रत पाठक यांच्या वाहनांच्या ताफ्यातील कारचा डिव्हायडरशी धडक होऊन पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शिपाई अभिषेक त्रिपाठी यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक सुरक्षा कर्मचारी कुंवर पाल आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात जखमी झालेले सुरक्षा कर्मचारी आणि चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशुतोष मोहन अग्निहोत्री आणि पोलीस अधिक्षक विनोद कुमार सह प्रशासन आणि पोलिस अधिकारी घटनास्थळावर पोहचले आहे. माजी खासदार सुब्रत पाठक देखील घटना स्थळी हजर होते. याशिवाय प्रदेशचे ऊर्जा राज्यमंत्री कैलास राजपूत आणि अनेक भाजपाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले आहे.
राज्य मंत्री कैलाश राजपूत याचे सपावर आरोप
या अपघातात पोलिस शिपाई अभिषेक त्रिपाटी यांच्या मृत्यूने पोलिस दलात शोक पसरला आहे. उत्तर प्रदेशातील ऊर्जा राज्य मंत्री कैलाश राजपूत यांनी सांगितले की हा अपघात दुर्दैवी होता.या मार्गावर अनेक वळणे आहेत. त्यामुळे येथे अनेकदा अपघात घडत असतात. त्यांनी समाजवादी पक्षावर आरोप करत यांच्या सरकारने स्वत:च्या लाभासाठी एक्सप्रेस-वे चुकीच्या पद्धतीने बांधल्याचे म्हटले आहे. कन्नोजचे पोलिस अधिक्षक विनोद कुमार यांनी या अपघात मृ्त्यू झालेल्या पोलीस शिपाई आणि जखमी शिपाई हे दोघेही कन्नोज येथे पोस्टींग असून भाजपाचे माजी खासदार सुब्रत पाठक यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ड्यूटीला होते. जखमी शिपायावर प्राथमिक उपचार करुन त्याला कानपूर येथील हायर सेंटर येथे हलवण्यात आले आहे.