ChatGPT: चॅट जीपीटीवर हे शब्द कधीच सर्च करू नका, पोलीस थेट घरी येणार

आजच्या काळात चॅटजीपीटी हे माहिती मिळवण्याचा एक अत्यंत प्रभावी साधन बनलं आहे. तुम्हाला कोणतीही समस्या असू द्या, चॅट जीपीटीमध्ये सर्च केल्यास अवघ्या काही सेकंदात तुम्हाला तुमच्या समस्याचं उत्तर मिळतं.

ChatGPT: चॅट जीपीटीवर हे शब्द कधीच सर्च करू नका, पोलीस थेट घरी येणार
ChatGPT
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 6:18 PM

आजकाल चॅटजीपीटी हे आपल्या हातात असलेलं माहिती मिळवण्याचं एक पॉवरफूल साधन बनलं आहे. तुमची कोणतीही समस्या असू द्या, तुम्हाला चॅटजीपीटीवर त्या प्रश्नाचं उत्तस सहज मिळून जातं. अनेकजण त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. चॅटजीपीटी हा माहितीचा खजाना बनला आहे. तसेच ते वापरण्यास देखील अवघड नसल्यामुळे त्याचा वापर कोणीही करू शकतो. परंतु एखाद्या तंज्ञत्रानाचे जसे फायदे असतात, तसेच त्याचे काही तोटे देखील असतात. काहीजण या तंत्रज्ञानाचा वापर हा चुकीच्या कामासाठी देखील करू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊच, चॅट जीपीटीच्या सिस्टममध्ये सेफ्टी गाईडाइन्स सेट करण्यात आल्या आहेत. तुम्ही चॅट जीपीटीचा एखादी चुकीची माहिती विचारण्याचा प्रयत्न केला जसं की एखाद्या गुन्हेगारी कृत्याविषयी माहिती विचारली,  किंवा एखाद्या प्रदेशामध्ये एखादी वस्तू प्रतिबंधित आहे, त्या वस्तूचा जर तुम्ही चॅटजीपीटीच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला तर चॅटजीपीटी कधीही अशा गोष्टींची माहिती तुम्हाला देत नाही.

परंतु तुम्ही जेव्हा अशा गोष्टी वारंवार चॅटजीपीटीला विचारतात. चॅटजीपीटीवरून एखाद्या प्रतिबंधित असलेल्या गोष्टीचा शोध घेतात. किंवा पोलिसांच्या दृष्टीकोणातून गुन्हा असलेल्या गोष्टींची माहिती जर तुम्ही वारंवार चॅटजीपीटीकडे मागत असाल तर अशावेळी मात्र तुमचा डिजिटल फ्रूट प्रिंटस आयपी अ‍ॅड्रेस ट्रॅककरून ही माहिती चॅटजीपीटीच्या माध्यमातून पोलिसांच्या सायबर सेलकडे जाण्याची शक्यता असते. त्यानंतर पोलीस तुमच्या घरी देखील येऊ शकतात. तुमची चौकशी देखील होऊ शकते.  त्यामुळे चॅटजीपीटीवरून एखादी माहिती सर्च करताना काळजी घ्यावी.

Loading...

तसेच चॅटजीपीटीवर कधीही तुमच्या वैयक्तिक बँक खात्याशी सबंधित माहिती, बँकेतील पैशांचे व्यवहार या संबंधी माहिती कधीही सर्च करू नये. तसेच तुमच्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती जसं की बँकेचं नाव, अकाउंट नंबर किंवा तुमच्या आधार कार्डशी संबंधित माहिती देखील चॅटजीपीकडे जाणार नाही याची देखील खात्री करावी. बाकी तुमच्या दैनदिव जीवनात ज्या काही अडचणी येतात, त्यासंबंधित तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी तुम्ही चॅटजीपीटीची मदत घेऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us