काही बाहेरच्या शक्तींमुळे… सरन्यायाधीश थेटच बोलले; एका कार्यक्रमात मोठं विधान
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका पदवीदान समारंभात 'बाह्य शक्तीं'मुळे कार्यक्रमात अनिश्चितता निर्माण झाल्याचे म्हटले. त्यांनी नव्याने पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना कायद्याच्या क्षेत्रात निर्भयता, विनम्रता आणि संवैधानिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले. कायद्याचे क्षेत्र थांबलेले नाही, ते सातत्याने विकसित होते. अन्याय दूर करणे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे यातच वकिलांना खरे समाधान मिळेल असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिव्हर्सिटीचे चान्सलर सूर्यकांत यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. काही बाहेरच्या शक्तींमुळे अजाणत्या आणि दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीत 34 व्या वार्षिक पदवीदान समारंभाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. जशी अपेक्षा करण्यात आली होती, तशी संधी मिळणार की नाही, अशी साशंकता होती. पण तसं झालं नाही, असं सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले.
बंगळुरूत पदवीदान समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. काही बाहेरच्या शक्तींमुळे कार्यक्रमाबाबतची अनिश्चितता निर्माण झाली होती. क्षणभर असं वाटलं की जशी अपेक्षा केली होती, तशी परिस्थिती नसेल, असं सूर्यकांत म्हणाले. गेल्या काही आठवड्यांपासून विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी हे विधान केलं. कार्यक्रमाबाबतची अनिश्चितता असातनाही हा कार्यक्रम वेळेत झाला. यावेळी फॅकल्टी मेंबर्स आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पदवीदान समारंभ पार पडला.
निर्भयताही हवी
कायद्याचं क्षेत्र हे कमकुवत हृदय असणाऱ्यांचं नाहीये, असं मला नेहमी वाटतं. या क्षेत्रात उतरायचं असेल तर केवळ कायद्यांची माहिती असून चालत नाही. तसेच केसेसचे संदर्भ माहीत असून चालत नाहीत, तर जे योग्य आहे, ते वाचवण्याची हिंमत आणि ज्यांचा आवाज कधीच ऐकला जात नाही, त्यांचा आवाज ऐकण्याची विनम्रता असली पाहिजे. माझ्या प्रिय, तरुण पदवीधरांनो, या दिमागी स्वातंत्र्याला निर्भयताही हवी असते. निकाल देण्यापूर्वी ऐका, एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्थितीपेक्षा वेगळ्या पद्धतीने समजून घेणं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या इभ्रतीला कोणतंही नुकसान होऊ न देता त्याच्याशी असहमत होता आलं पाहिजे, असं सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं.
कायदा थांबलेला नाही
कायदा थांबलेला नाही, हे तुम्ही लवकरच पाहणार आहात. कायदा श्वास घेतो आणि त्याला मानणाऱ्यांच्या मेंदू आणि कामांनी तो विकसीत होतो. तुम्ही ज्या प्रकरणात वाद घालता, जो कॉन्ट्रॅक्ट करता, जो सल्ला तुम्ही देता, आणि जे निर्णय तुम्ही लिहिता, ते सर्व आपल्या देशाच्या न्यायाच्या मोठ्या क्षेत्राला योगदान देणारं ठरेल, असं त्यांनी सांगितलं.
तरच समाधान मिळेल
तुमच्या सुविधांमुळे देशाच्या सिद्धांताशी तडजोड करू नका. व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी शॉर्टकर्ट मार्गांची वाट धरू नका. या संस्थेत तुम्हाला जी मूल्य शिकवली गेली, ती आयुष्यभर सोबत ठेवा आणि त्यानुसार काम करा, असं सांगतानाच वकिलांना अन्याय दूर केल्याने, लोकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण केल्याने आणि संवैधानिक मूल्य कायम ठेवल्यानेच समाधान मिळू शकतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.