तिरंगा आंदोलनापूर्वी अभिजीत दीपकेंची खळबळजनक पोस्ट, मनातील सर्वच सांगितलं; थेट..

abhijeet dipke news : तिरंगा आंदोलनापूर्वी अभिजीत दीपकेंनी खळबळजनक पोस्ट केली आहे. दीपकेंनी व्यापाऱ्यांच्या आरोपांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

तिरंगा आंदोलनापूर्वी अभिजीत दीपकेंची खळबळजनक पोस्ट, मनातील सर्वच सांगितलं; थेट..
abhijeet Dipke cjp
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 1:29 PM

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. परंतु सलग दिल्लीत आंदोलन होत असल्याने व्यवसाय ठप्प पडत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली. दुकानदार, व्यापाऱ्यांच्या आरोपावर आता अभिजीत दीपकेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी जयपूरमध्ये मारहाण झाल्याचाही उल्लेख केला. त्यांनी भाजपच्या आंदोलनाचा इतिहास देखील सांगितला.

दिल्लीतील कॅनॉट प्लेस कॉक्रोच जनता पार्टीने तिरंगा मार्च काढण्याची घोषणा केली आहे. या मार्चआधी सरकार हे पार्क दोन दिवसांसाठी बंद करण्याची घोषणा केली. अभिजीत दीपकेंनी म्हटलं की, शांततापूर्वक मार्गाने तिरंगा मार्चने व्यवसायाचं कोणतंही नुकसान होणार नाही. सरकार मेट्रो, शहर बंद ठेवत असल्याने व्यावसायिकांचं नुकसान होत आहे .सरकारने इंटरनेट सेवा बंद केली. लोकांच्या प्रवासावर बंदी घातली. सरकारने दिल्लीचं वातावरण युद्ध सदृश्य केलं’.

Loading...

दीपकेंनी भाजपच्या जुन्या आंदोलनाचाही दाखला दिला. त्यांनी म्हटलं की,  कॉक्रोच जनता पार्टी नेहमी महात्मा गांधींच्या मार्गाचं पालन करते. आम्ही त्यांचा मार्ग सोडणार नाही. आम्ही मुंबई, पुणे, जयपूर, बेंगळुरू, नागपूरमध्येही आंदोलन केलं. आम्ही यंदाही शांततापूर्वक आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी म्हटलं की, जयपूरमध्ये मला मारहाण झाली. परंतु मारहाण झाल्यानंतर प्रतिकार केला नाही. हिंसेचं उत्तर हिसेंने द्यायचा आमचा विचार नाही. आम्ही त्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करून उत्तर देऊ. आमची ताकद संविधान आहे. संविधानाप्रती श्रद्धा आहे. आम्हाला कोणी चिथावणी दिली, तरी आम्ही गांधींचा मार्ग सोडणार नाही’.

‘सरकारकडून आम्हाला अराजकतावादी भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याला अराजकता म्हणता येणार नाही. पदावर बसलेल्या लोकांना उत्तर मागणे, जाब विचारणे अराजकता नाही. हीच लोकशाहीची मूलभूत अभिव्यक्ती आहे. आज जो पक्ष आता सत्तेत आहे. त्या पक्षाने रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून प्रश्न विचारली आहेत. त्यावेळी त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले. पोलिसांकडून कारवाई झाली.  आज आंदोलनातील बरेच जण सत्तेत आहेत. विरोधी पक्षात असताना आंदोलनाला लोकशाही हक्क म्हणणे आणि सत्तेत आल्यावर सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोका मानणे, याला ढोंगीपणा  म्हणता येईल, अशी टीका दिपकेंनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us