CJP Protest : ‘पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय, चला तुम्ही तुमच्या हिशाबाने..’ CJP नेते आशुतोष रांका, सौरव दासची मोठी घोषणा

CJP Protest :सीजेपी नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे जामिनावर बाहेर आले आहेत. अभिजीत दीपके सध्या आजीच्या दु:खात आहेत. आज आशुतोष रांका, सौरव दास पोलीस स्टेशन मध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

CJP Protest : पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय, चला तुम्ही तुमच्या हिशाबाने.. CJP नेते आशुतोष रांका, सौरव दासची मोठी घोषणा
saurav das
| Updated on: Oct 12, 2026 | 12:16 PM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके तसचं प्रवक्ते सौरव दास, आशुतोष रांका यांना काल जामीन मंजूर झाला. पण त्यात काही अटी-शर्ती आहेत. त्या आधारावर हा जामीन मंजूर झालाय. आज सौरव दास आणि आशुतोष रांका पोलीस स्टेशनमध्ये आले होते. जंतर-मंतरवर आंदोलनाची परवानगी मिळावी या मागणीसाठी ते आले होते. बाहेर मीडियाशी संवाद साधताना सीजेपीने मोठी घोषणा केली आहे. “ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तो पर्यंत शांततेत आंदोलन चालू राहिल” असं सीजेपीने म्हटलं आहे. “हे लोकांच्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे. दिल्ली पोलीस क्रूरपणे वागतायत. बेकायदेशीर आदेश त्यांना दिले जात आहेत. स्वतंत्र पत्रकार, वकिल यांच्याशी क्रूर वर्तन केलं जात आहे” असा आरोप सौरव दास यांनी केला. ‘पोलीस प्रशासनाला ही गोष्ट समजली पाहिजे’ असं ते म्हणाले.

“आंदोलन करणं हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगी द्या असं सांगतोय. संपूर्ण दिल्लीत ते गोंधळ घालतायत” असं सौरव दास म्हणाले. “पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर आम्ही परवानगी मागतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने तारीख आणि वेळ द्या. जंतर-मंतर आमचं आहे, तिथे परवानगी मिळाली पाहिजे” असं सौरव दास म्हणाले.

Loading...

परवानगी घेण्यासाठी आले होते

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सौरव दास आणि आशुतोष रांका हे पार्लमेंट पोलीस ठाण्यात आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलय.अधिकृत परवानगी मिळवण्याच्या दृष्टीने सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पोलिसांशी चर्चा केली. दिल्ली पोलिसांनी सांगितलेलं की, जंतर-मंतरवर अशी अचानक आंदोलनाला परवानगी मिळत नाही. त्यासाठी 10 दिवस आधी परवानगी घ्यावी लागते. म्हणून ते आले होते.

मुंबईच्या आंदोलनात कोणा-कोणावर गुन्हे दाखल

दुसरीकडे मुंबईत दादर शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनाप्रकरणी यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई, आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मनसे आणि ठाकरेंच्या काही नेत्यांवर देखील गुन्हे दाखल झाले आहेत. काल झालेल्या आंदोलनावरून शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई केली. सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झालेत. सरकारी कामात अडथळा आणल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल झालेत. विनापरवानगी जमाव जमवणे, परवानगी नसताना आंदोलन करणे असे गुन्हे दाखल झालेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us