कॉकरोच जनता पार्टीला ज्याची भीती तेच घडतंय, दोन मोठ्या नेत्यांची चूक भोवणार, अभिजीत दिपके..
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीने मोठे आंदोलन पुकारले. पण त्यांच्या या आंदोलनाला दणका बसला. थेट आंदोलन सुरू होण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी ते मोडीत काढले. त्यातच सीपेजीचे नेते मोठ्या प्रमाणात घेरले आहेत.

कॉकरोच जनता पार्टी अडचणीत सापडली आहे. दिल्ली विमानतळाहून सीजेपीच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यापासून त्यांच्यापुढे एक एक समस्या उभ्या होत आहेत. जामीन देताना त्यांच्याकडून काही बॉन्ड लिहून घेण्यात आली. पुढील एक वर्ष शांती ठेवण्याबद्दल त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेण्यात आला. त्यात काही नियम आणि अटी होत्या. त्यानंतरच त्यांना जामीन मिळाला. रिपोर्टनुसार, पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहण्यासाठी साैरभ दास आणि आशुतोष रांका यांनी वेळ मागितला. ज्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून त्यांना पुन्हा नोटीस पाठवली जाऊ शकते. दिल्ली पोलिसांनी साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना राजाैरी गार्डनर कार्यालयात बोलावले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची जेलमधून सुटका झाली. स्पेशल एग्झिक्यूटिव्ह मजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना शांती ठेवण्याबद्दल बॉन्ड लिहून घेतला. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
50 हजार भरून हा बॉन्ड केला. यासोबतच या दोघांनाही सुनावणीच्या तारखेला उपस्थित राहवे लागणार आहे. त्यांनी बॉन्डवरील नियमात स्पष्ट केले की, लिहिलेल्या अटी पूर्ण करणार. कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणार नाहीत. शांती ठेवण्यास मदत करू. यासोबतच भविष्यात कोणतेही आंदोलन कायद्यात राहूनच करणार. पोलिसांच्या कारवाईत 13 ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ज्यात साैरभ दास, रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह 11 सीजेपीचे नेते उपस्थित होते. ज्याठिकाणी यांच्याकडून आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला, ते डी नोटीफाइड असतानाही त्यांनी तिथे प्रवेश केला. शांती ठेवण्याच्या नियम त्यांनी मोडला. त्यानंतर साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना थेट जेलमध्ये जावे लागले.
पोलिसांनी त्यांना चाैकशीसाठी बोलावले. मात्र, त्यांनी या चाैकशीकडे पाठ फिरवली. यामुळे दिल्ली पोलिस आशुतोष रांका आणि साैैरभ यांना नोटीस जारी करू शकते. दिवाळी आपल्या कुटुंबियांसोबत साजरी करा, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केले. मात्र, पुढील एक वर्ष त्यांना शांती भंग करता येणार नाही. कायद्याच्या कचाट्यात सीजेपीचे सर्व नेते अडकले आहेत. दिवाळीनंतर सीजेपी काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.