CJP च्या तिरंगा मार्चआधीच मध्यरात्री मोठा राडा; अनेक जण पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

cjp tiranga march : सीजेपीच्या तिरंगा मार्चआधीच मध्यरात्री मोठा राडा झाला आहे. पोलिसांनी मध्यरात्री आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

CJP च्या तिरंगा मार्चआधीच मध्यरात्री मोठा राडा; अनेक जण पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
Delhi police
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 7:52 AM

दिल्लीत सीजेपीच्या तिरंगा मार्चआधीच मोठ्या घडामोडी घडल्या. दिल्ली पोलिसांनी  ‘कनॉट प्लेस’वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. NSUI कार्यकर्त्यांनी महिला सदस्यांना झालेल्या कथित मारहाणीच्या विरोधात FIR नोंदवण्यासाठी आंदोलन केलं. यानंतर NSUI चे अध्यक्ष विनोद जाखड यांच्यासहित अनेक सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

NSUI च्या दाव्यानुसार, दिल्ली पोलसांनी  संघटनेच्या काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. यासाठी संघटनेने पोलिसांत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. पोलीस ठाण्यातील सर्व उच्च पदस्थ पोलिसांशी संपर्क साधल्यानंतरही एफआयआर नोंदवून घेतला नाही, असा संघटनेचा आरोप आहे. एफआयआर नोंदवून घेत नसल्याने संघटनेने पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी NSUI च्या संघटनेतील आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Loading...

NSUI संघटनेचा पोलिसांवर आरोप

जाखड यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली. एका बंद खोलीत बुटांनी माराहण केल्याचा देखील आरोप केला आहे. त्यानंतर काँग्रेस प्रणित NSUI संघटनेने FIR नोंदवण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी एफआयआर नोंदविण्याऐवजी संघटनेतील सदस्यांवर कारवाई केल्याचा आरोप जाखड यांनी केला. NSUI च्या रवी पांडे यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्यास आंदोनल आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा देखील संघटनेने दिला.

दिपकेंचा धक्कादायक दावा

दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी दिल्लीतील ‘कनॉट प्लेस’च्या सेंट्रल पार्कमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सीजेपी नेत्यांच्या समानार्थ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्ली पोलिसांनी संबंधित आंदोलनस्थळी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत 163 कलम देखील लागू करण्यात आला आहे. तसेच येत्या 16 ते 17 ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क बंद करण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.  तर गुरुवारी पत्रकार परिषद घेताना अभिजीत दिपकेंनी धक्कादायक दावा केला. मला पोलीस कधीही ताब्यात घेऊ शकतात, असा दावा अभिजीत दिपकेंनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us