Cockroach Janta Party : मैं भी कॉकरोच आंदोलन : डिजीटल पार्टीचं भविष्य काय ? 2029 ला सरकारसाठी ठरणार आव्हान ?

अवघ्या ५ दिवसांत ५६ लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवणारी कॉकरोच जनता पार्टी (CJP) सध्या चर्चेत आहे. केवळ X वरील एका पोस्टने सुरू झालेल्या या पक्षाची ज्योतिषीय कुंडली त्याचे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचे संकेत देते. 'झुरळं' संबोधल्या गेलेल्या तरुणाईचा आवाज बनलेला हा पक्ष २०२९ च्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय शक्ती बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तरीही सरकारी दबावाला सामोरे जावे लागेल.

Cockroach Janta Party : मैं भी कॉकरोच आंदोलन : डिजीटल पार्टीचं भविष्य काय ? 2029 ला सरकारसाठी ठरणार आव्हान ?
| Updated on: May 22, 2026 | 8:32 AM

Cockroach Janta Party : अवघ्या 5-6 दिवसांपूर्वी, 16 मे 2026 च्या रात्री एका अजब पक्षाचा उदय झालाय ना ऑफीस, न झेंडा, ना कोणतंही निवडणूक चिन्ह, फक्त X वर एक पोस्ट आणि एक Google Form.. नाव ठेवण्यात आलं… कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP

केवळ 5 दिवसांत 56 लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि 1 लाखांहून अधिक सदस्य. महुआ मोईत्रा पासून ते प्रशांत भूषण पर्यंत सर्वांनी या पक्षाला समर्थन दर्शवलं. मात्र 21 मे रोजी सरकारने Xवरील अकाऊंट भारतात बंद केलं. . पण सर्वात धक्कादायक गोष्ट त्याच्या ज्योतिषीय कुंडलीत दडलेली आहे. कॉकरोच जनता पक्षाची कुंडली त्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल जे संकेत देत्ये त्यावरून आहे, ज्यामुळे येत्या काळात हा पक्ष वादविवाद आणि चर्चेचा एक नवीन केंद्रबिंदू बनू शकतो. जाणून घेऊ सविस्तर

जन्मकहाणी : अपमान ते आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक विधान करत बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. दुसऱ्याच दिवशी, मूळचा भारतीय पण सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीत शिकत असलेला 30 वर्षीय विद्यार्थी आणि ‘आप’चा माजी सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट अभिजीत दीपक याने X वर पोस्ट लिहीत पार्टीची घोषणा केली. “बाहेरच्या सर्व झुरळांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू करत आहे (Launching a new platform for all the cockroaches out there.) असं त्याने नमूद केलं होतं.

आणि इथूनच एका डिजिटल वादळाला सुरुवात झाली. याच कॉकरोच पक्षाचे नाव सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे आणि दर रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर, चहा-कॉफीच्या टपरीवर आणि कॅफेमध्ये याच पक्षाची चर्चा सुरू आहे.

पक्षाचे भविष्य – 16 मे 2026 ला रात्री 10.37 वाजता पक्षाची स्थापना झाली. पक्षाची अधिकृत वेबसाइट 17 मे 2026 रोजी सुरू झाली असली तरी, पहिली पोस्ट त्याच वेळी X वर टाकण्यात आली होती. या पहिल्या पोस्टवर आधारित ज्योतिषीय अंदाज आश्चर्यकारक आहे :

काय आहे कुंडलीतील अंदाज ? जाणून घ्या पूर्ण गणित

त्यावेळच्या कुंडलीत लग्न मकर आणि वृषभ राशी होती, ज्यात चंद्र उच्च राशीत होता. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र वृषभ राशीत असतो, तेव्हा तो सर्वात बलवान किंवा सर्वोच्च स्थितीत असतो. याचा सरळ अर्थ म्हणजे लोकांशी एक विलक्षण आणि सखोल नाते निर्माण होणे. कॉकरोच जनता पक्षाला केवळ पाच दिवसांत 56 लाख फॉलोअर्स मिळवणे, हे या ग्रहस्थितीचेच द्योतक आहे.

बुध, आदित्य आणि मंगळ यांचा प्रभाव : कुंडलीतील बुध-आदित्य युती ही विलक्षण संवादशक्ती प्रदान करते. यामुळेच हा पक्ष मीम्स, रील्स आणि व्यंग यांसारख्या सर्व सोशल मीडिया भाषांमध्ये पारंगत असल्याचे सिद्ध झाले आहे. मंगळ स्वतःच्या मेष राशीत आहे, जो तरुणांना धैर्य आणि मोठ्या प्रमाणावर जनआंदोलने सुरू करण्याची शक्ती देतो.

नक्षत्र आणि दोष : सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कुंडलीत कालसर्प दोष नाही, म्हणजेच चळवळीच्या अस्तित्वाला कोणताही मोठा धोका निर्माण होणार नाही. या पक्षाचा जन्म कृत्तिका नक्षत्रात झाला आहे, ज्याचा मूळ स्वभाव, हा व्यवस्थेवर टीका करणे आणि सुधारणांची मागणी करणे हा आहे. हाच या पक्षाचा आत्मा आहे.

अकाउंट बंद ?

२१ मे रोजी, जेव्हा @CJP_2029 च्या X खात्यावर ‘Account Withheld in IN, in response to a legal demand ‘ असे दिसू लागले, तेव्हा अनेक लोकं आश्चर्यचकित झाले. कुंडलीनुसार, सध्याच्या राहू अंतर्दशेने खोटे आरोप, बदनामी आणि कामात अडथळे येण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. पक्षाच्या जन्मानंतर अवघ्या पाच दिवसांतच हे खरे ठरले.

भविष्यात निवडणूक लढणार हा पक्ष ?

याचं स्पष्ट उत्तर होकारार्थी आहे आणि 2029 साली या पक्षाची पहिली मोठी परीक्षा असेल. 2028-29 मध्ये या कुंडलीत बुध अंतर्दशेचा काळ सुरू होईल, जो ज्योतिषशास्त्रानुसार नवीन कार्यांमध्ये निश्चित यशाचा काळ मानला जातो.
यानंतर 2030 ते 2040 या काळात चंद्राची महादशा सुरू होईल. कुंडलीनुसार, हा तो काळ आहे जेव्हा तुमच्या सर्व योजना पूर्णपणे साकार होतील. याला झुरळ जनता पक्षाचे ‘सुवर्णयुग’ म्हटले जाऊ शकते.

सरकारसाठी किती मोठा धोका ?

सध्या (2026) सरकारला असलेला तात्काळ निवडणुकीचा धोका नगण्य आहे. मात्र, 2028-29 पर्यंत, हा पक्ष एकसंध राजकीय शक्ती बनेल आणि देशातील ‘जनरेशन-झेड’वर, तरुण मतदारांवर पक्षाचा मोठा प्रभाव पडेल.

या पक्षाचं राशिभविष्य आणखी एक महत्त्वपूर्ण इशारा देतंय. 2027 ते 2029 या काळात हे भविष्य साडेसातीच्या उदय अवस्थेत असेल. या काळात सरकारकडून कायदेशीर आणि राजकीय दबाव वाढेल, संघटनेत अंतर्गत मतभेद निर्माण होतील आणि आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो. याच कठीण काळात 2029 च्या सार्वत्रिक निवडणुका होतील, ज्या CJP सर्वात मोठी परीक्षा ठरतील.

सोशल मीडियावरील एक उपहास म्हणून सुरू झालेला हा पक्ष आता भारतीय राजकारण आणि डिजिटल विश्वातील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक बनला आहे. ज्या देशात बेरोजगार तरुणांना ‘झुरळं’ म्हणून तुच्छ लेखले जाते, त्याच देशात जनरेशन-झेडचे तरुण आपल्या अस्मितेसाठी लढायला उभे राहताना दिसत आहेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

 

Follow Us