GK : कोच B चा अर्थ थर्ड AC, A चा अर्थ सेकंड AC..मग AB कोच कोणत्या वर्गासाठी असतो.

भारतीय रेलवे की काही ट्रेनमध्ये एबी कोचही दिला जातो. तुम्हाला माहीत आहे का हा कोच सेकेंड एसी साठी आहे का थर्ड एसी साठी ?

GK : कोच B चा अर्थ थर्ड AC, A चा अर्थ सेकंड AC..मग AB कोच कोणत्या वर्गासाठी असतो.
INDIAN RAILWAY AB COACH
| Updated on: Jul 14, 2026 | 9:03 PM

भारतीय रेल्वे प्रत्येक वर्गाच्या प्रवाशासाठी कोच तयार केले जातात. उदा. स्लीपर, जनरल, थर्ड एसी, सेकेंड एसी, फर्स्ट एसी. या वेगवेगळ्या कोचचा एक कोड देखील असतो. ज्यामुळे हे डबे ओळखण्यास सोपे जाते. स्लीपरचे डब्बे S ने ओळखले जातात. तर B थर्ड एसी आणि ए सेकेंड एसीसाठी असतो. परंतू,तु्म्हाला माहिती आहे का काही ट्रेनमध्ये एक खास कोच असतो. ज्याचे नाव असते – AB. आता तुम्ही विचार करत असाल की अखेर एबी कोचचा अर्थ काय आहे आणि यात कोणत्या प्रवाशांना बसण्याची परवानगी मिळते, चला तर पाहूयात एबी कोचची कहाणी

कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत AB कोच?

ज्या प्रवाशांची सीट थर्ड एसीमध्ये असते. ते B नावाच्या डब्यात बसतात. तर सेकेंड एसीचे प्रवासी ए नावाच्या डब्यात बसते. अशात जे एबी कोच असतो, तो ए आणि बीचे कॉम्बिनेशन असतो. याचा अर्थ आहे की यात सेकंड एसी देखील असतो आणि थर्ड एसी देखील असतो. यात काही सीट थर्ड एसीच्या हिशेबाने असतात काही सीट सेकंड एसीच्या हिशेबाने असतात. अशात जेव्हा कधीही तुम्हाला एबी कोच अलॉट झाला तर तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की तुम्हाला कुठे बसायचे आहे.

या कोचमध्ये एकाच नंबरचे दोन सीट असतात. म्हणजे सीट नंबर ३, दोन जागी असेल. एक थर्ड एसीसाठी तर एक सेंकड एसी साठी असेल. त्यामुळे तुम्ही हे पाहून घ्या की तुम्ही सेकंड एसीच्या सीटवर बसला आहात की थर्ड एसीच्या सीटवर..

कसे ओळखावे सीट कुठे ?

आता प्रश्न असा आहे की तुम्हाला कसे कळेल की कोणत्या सीटवर बसायचे आहे. आपली सीट ओळखण्याची पद्धत अशी आहे की आधी तुम्ही हे पाहून घ्या की तुम्ही कोणत्याही कॅटगरीत सीट बुक केली आहे. जर तुम्ही थर्ड एसीची तिकीट बुक केले असेल तर तुमची सीट येथे मिडल बर्थ देखील असेल. जर सेकंड एसीमध्ये सीट असेल तर तेथे मिडल बर्थ नसणार, तुम्हाला केवल लोअर बर्थ आणि अपर बर्थची सीटच मिळेल.

या शिवाय थर्ड एसी वाल्या सेक्शनमध्ये सीटच्या पुढे पडदे मिळणार नाही. तर सेकेंड एसीमध्ये सीटच्या पुढे पडदेही लावलेले असतात. अशात तुम्ही या दोन पद्धतीने ओळखू शकता की तुमची योग्य आसन कोणते. जर तरीही कन्फ्युजन असेल तर तुम्ही टीटीईशी बोलून देखील आपली सीट शोधू शकता.

 

Follow Us