सरन्यायाधीशांचं एक स्टेटमेंट अन् कॉकरोच जनता पार्टीचा उदय, फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड
सरन्यायाधीशांनी केलेल्या एका विधानाने मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आता थेट कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. हैराण करणारे म्हणजे या पक्षाला जोरदार प्रतिसाद देखील मिळत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स वाढत आहेत.

देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाईला थेट झुरळाप्रमाणे म्हटल्याने मोठी खळबळ उडाली. त्यांनी दुसऱ्यादिवशी थेट आपण असे बोललोच नसल्याचे म्हटले. सरन्यायाधीशांच्या या विधानानंतर त्यांच्या विधानाचा निषेध करण्याकरिता कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. विशेष बाब म्हणजे या पार्टीने पाच दिवसात सोशल मीडियावर कोट्यावधी फॉलोअर्सही मिळवले. धाडधाड यांच्या फॉलोवर्समध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. ही कॉकरोच जनता पार्टीची स्थापना एका मराठी मुलानेच केली. इन्स्टाग्रामवर 10.5 मिलियन आणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 पर्यंत या पार्टीच्या फॉलोवर्सची संख्या पोहोचली. या पार्टीने चांगला धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. अत्यंत वेगाने या पार्टीला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरुणाईचा एक वेगळाच उद्रेक बघायला मिळतोय. काही दिवसात ही पार्टी धमाकेदार कामगिरी करू शकते, असे दिसत आहे.
कॉकरोच जनता पार्टीची स्थापना महाराष्ट्रातील अभिजीत दीपके यांनी केली. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी हे त्याचे घोषवाक्य आहे. या पक्षाने केवळ एका दिवसात 40 लाखांहून लोकांना आपल्यासोबत सोडले. इन्स्टाग्रामवर भाजपचे 87 लाख फॉलोअर्स आहेत आणि काँग्रेसचे 1.33 कोटी फॉलोअर्स आहेत. या रेसमध्ये आता कॉकरोच जनता पार्टी वेगाने पुढे जात आहे.
एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सरन्यायाधिशांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना झेट कॉकरोचसोबत केली. तोच राग डोक्यात ठेऊन कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. मात्र, वाद वाढत असतानाच सरन्यायाधिशांनी आपण असे काही बोललोच नसल्याचे म्हटले.
या पक्षाच्या सदस्यत्वासाठी चार अटींवर पात्रता ठरली आहे. एक म्हणजे बेरोजगारी, दुसरी म्हणजे आळस आणि निष्क्रिय राहणे, तिसरे ऑनलाईन राहण्याचे मोठे व्यसन, चाैथी व्यावसायिकपणे भावना व्यक्त करण्याची क्षमता. विषय बाब म्हणजे या पार्टीला मोठ्या प्रमाणात लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दणादण या पार्टीचे फॉलोवर्स वाढत आहेत. ही पार्टी आता देशात नक्की नवीन काय क्रांती करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सोशल मीडियावर तर या पार्टीची मोठी हवा बघायला मिळतंय.