Cockroach Janta Party: ‘कॉकरोचचं’ भविष्य काय? सरकार डिजिटल आंदोलन चिरडणार की नवा राजकीय भिडू कमाल करणार?
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: समाज माध्यमांवर सध्या कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातला आहे. देशाच्या सरन्यायधीशांच्या एका वक्तव्यानंतर अचानक या डिजिटल आंदोलनाची लाट आली. तरुणाईतील रोष समोर आला, तर या आंदोलनाला बदनाम करण्याचे आणि त्याचे दहशतवाद्यांशी संबंध जोडण्याचे प्रयत्नही सुरू झाले. काय आहे या 'कॉकरोच' भविष्य?

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: समाज माध्यमावर केव्हा काय ट्रेडिंग होईल, कोण व्हायरल होईल आणि कोण हिरो ठरेल याचा अंदाज बांधता येत नाही. एक लाट येते आणि काही दिवस त्याचाच बुडबुडा कायम असतो. सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी ट्रेडिंगमध्ये आहे. तिचे ट्विटर खाते सस्पेन्ड झाले आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंट हॅक झाले आहे. तरीही प्रत्येक तरुण त्याची लढाई या नवीन बॅनरखाली लढत आहे. कॉकरोच जनता पार्टी ही अचानक इंटरनेट आणि डिजिटलच्या युगात आलेली भलीमोठी लाट ठरलेली आहे. या आंदोलनाने देशातील तरुणाईच्या आवाजाला बळ दिले. त्यांच्यातील खदखदता असंतोष समोर आला. देशाच्या सरन्यायधीशांनी कॉकरोच अशी टिप्पणी करताच हे आंदोलन एकाएक उफाळून आले. त्याने डिजिटल इंडिया व्यापला. पण या अल्पवयीन चळवळीचे भविष्य तरी काय आहे? उपरोधिक आंदोलनाने व्यापला डिजिटल प्लॅटफॉर्म ...