तुम्ही Gen Z नाही तर..दीपकेच्या दोन सहकाऱ्यांना HC ने इतकं सुनावलं की त्यांनी याचिकाच घेतली मागे

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन पुकारले. त्यांच्या या आंदोलनाने खळबळ उडाली. सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातही आंदोलन पुकारले. पण पोलिसांनी त्यापूर्वीच मोठी कारवाई केली. त्यातच आता अभिजीत दिपके यांना मोठा दणका बसला.

तुम्ही Gen Z नाही तर..दीपकेच्या दोन सहकाऱ्यांना HC ने इतकं सुनावलं की त्यांनी याचिकाच घेतली मागे
Saurabh Das and Ashutosh Rana Abhijeet Dipke
| Updated on: Oct 21, 2026 | 2:05 PM

10 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले. पण त्यांच्या या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके याच्यासह महत्वाच्या नेत्यांना ताब्यात घेतले. या कारवाईने एकच मोठी खळबळ उडाली. सीजेपीचे प्रमुख नेते साैरभ दास आणि आशुतोष रांका यांची रवानगी जेलमध्ये झाली. त्यांना अगोदर जामीन देण्यात आला. मात्र, यावेळी काही नियम आणि अटही ठेवण्यात आल्या. त्यांनी त्यानंतर त्या नियमांचे थेट उल्लंघन केले आणि पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केले आणि रवानगी जेलमध्ये केली. त्यातच आता दिल्ली हायकोर्टाने साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना चांगलेच फटकारले आहे. कोर्टाने थेट म्हटले की, तुम्ही जेंनझी नाहीत… सीजेपीच्या या नेत्यांना स्पेशल एग्झीक्युटिव्ह मजिस्ट्रेट कोर्टाच्या कारवाईवर वाट पाहण्याची आणि सरळ हायकोर्टात येण्यावर प्रश्न उपस्थित केले.

यासोबतच कोर्टाने थेट म्हटले की, देशाबाहेर काय सुरू आहे, याची कल्पना तुम्हाला आहे का? न्यायमुर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी सीजेपीच्या याचिकेवर भाष्य केले. यादरम्यान सीजेपीचे वकील वारंवार कोर्टातील सुनावणी आणि दिलासा मिळण्याची मागणी करत होते. कोर्टाने त्यांना आठवण करून दिली की, त्यांच्याकडून बॉन्डचे उल्लंघन करण्यात आले.

Loading...

न्यायमूर्तींनी म्हटले की, 11 ऑक्टोबरला ज्यावेळी हा बॉन्ड स्वीकारला गेला त्यानंतर त्याचे उल्लंघन होते, त्यावेळी बीएनएसएस अंतर्गत कारवाई केली जाते. या सर्व प्रक्रियेची पालन करण्याऐवजी तुम्ही नोटीस देऊन मोठे पणा दाखवत आहात. देशाबाहेर काय स्थिती आहे, हे सांगतानाही कोर्ट दिसले. अखेर सीजेपीने आपली याचिकाच मागे घेतली.

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन पुकारले. यावेळी त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात हे आंदोलन पुकारले. पण त्यांच्या आंदोलनापूर्वीच थेट पोलिसांनी महत्वाच्या नेत्यांना उचलले. सीजेपीने नीट पेपरफुटीत मोठे आंदोलन पुकारले. देशभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. सीजेपीने त्याच पद्धतीचे आंदोलन यावेळीही पुकारले. पण पोलिसांनी त्यापूर्वीच मोठा गेम केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us