
CRPF Jawan Marry Pakistani Girl: काही महिन्यांपूर्वी सचिन आणि सीमा हैदर यांची आंतरराष्ट्रीय लव्ह स्टोरी गाजली होती. भारत आणि पाकिस्तानमधील असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही लव्ह स्टोरी चर्चेत आली होती. आता दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध असताना केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील (CRPF) जवानाने पाकिस्तानी मुलीसोबत प्रेम केले. त्यांचा व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग निकाह झाला. आता त्याची दुल्हन १५ दिवसांसाठी भारतात आली आहे. त्याचवेळी सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. या लग्नाने जम्मू-कश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे.
सीआरपीएफ जवान मुनीर अहमद सध्या जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिव खोरी येथे तैनात आहेत. त्याची वधू मनाल खान ही पाकिस्तानातील पंजाब भागातील रहिवासी आहे. मनाल ही पाकिस्तानातील पंजाबमधील गुजरनवाला भागातील मोहम्मद असगर खान यांची मुलगी आहे. 24 मे 2024 रोजी त्यांचे लग्न ठरले होते. परंतु मनाल हिला व्हिसा मिळाला नाही. यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लग्न केले.
अधिकृतपणे मुनीरची पत्नी झाल्यानंतर मनाल हिला 15 दिवसांचा व्हिसा मिळाला. यानंतर ती आपल्या पतीला भेटण्यासाठी अटारी-वाघा बॉर्डरमार्गे भारतात पोहोचली. मनालचे सासरचे लोक तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. ती भारतात आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परिस्थितीची संवेदनशीलता समजून पोलीस त्यांच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मनाल ही जम्मू-काश्मीरमध्ये आल्यानंतर गावातील लोकांनी तिला पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
मुनीर आणि मनाल यांचे लग्न झाले. आता पुढे काय होणार आहे? मनाल भारतात राहण्याची परवानगी मिळेल का? या लग्नाचा दोन्ही देशांतील संबंधांवर काही परिणाम होईल का? हे असेच काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळतील.
लग्नानंतर मुनीरच्या कुटुंबियांनी सांगितले की, मनाल ही कायदेशीररित्या भारतात आली आहे. सर्व यंत्रणांच्या परवानगीनंतर तिला भारतात आणण्यात आले आहे. घरी आल्यावर मनाल हिने सासरच्या लोकांसाठी राजस्थानी पद्धतीचे जेवण बनवले.